Join us  

भारतीय क्रिकेटपटूंना ओळखलंत का? अष्टपैलू खेळाडूनं शेअर केला पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ

हार्दिकनं 2016मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले, तर कृणालनं 2018मध्ये पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 10:42 AM

Open in App

हार्दिक आणि कृणाल पांड्या या भावंडांनी भारतीय संघातील आपलं स्थान पक्कं केलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणारे हे दोघही यशाच्या शिखरावर आहेत. लॉकडाऊनमुळे क्रिकेट स्पर्धा होत नसल्यामुळे सर्व क्रिकेटपटू घरीच आहेत. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. कृणालनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात या भावंडांना ओळखताही येत नाही. कृणालनं त्यांच्या पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि हार्दिकनंही तो रिशेअर करताना 'हे खरं सोनं' अशी कमेंट केली आहे.

कृणालनं शेअर केलेला व्हिडीओ हा त्यांच्या बडोदाच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळतानाचा आहे. हार्दिकही त्यावेळी वयोगटातील स्पर्धांमध्ये खेळत होता. तिथून सुरू झालेला प्रवास आज त्यांना टीम इंडियापर्यंत घेऊन आला आहे. कृणाल टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघातील सदस्य आहे, तर हार्दिक तीनही फॉरमॅटमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करतो.  

पाहा व्हिडीओ...

हार्दिकनं 2016मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले, तर कृणालनं 2018मध्ये पदार्पण केले. हार्दिकनं 11 कसोटी, 54 वन डे आणि 40 वन डे सामन्यांत अनुक्रमे 532, 957 आणि 310 धावा केल्या आहेत. त्यानं एकूण 109 विकेट्स घेतल्या आहेत. कृणालनं 18 ट्वेंटी-20 सामन्यांत 121 धावा आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत.  
टॅग्स :हार्दिक पांड्याक्रुणाल पांड्या