Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहकार्य करणाऱ्याला कधीच विसरू नका! जेमिमा रॉड्रिग्ज

कोणीतीही व्यक्ती एकट्याच्या जोरावर यशस्वी होत नाही. त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेकांचे सहकार्य असते. मग ते प्रशिक्षक, पालक किंवा मित्र असो, यशाच्या शिखरावर असताना अशा व्यक्तीला विसरू नका. जर तुम्ही नम्र राहिलात, तर यश मिळविण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा मोलाचा सल्ला भारतीय महिला क्रिकेट संघाची सर्वात युवा खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज हिने युवा क्रिकेटपटूंना दिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 07:15 IST

Open in App

मुंबई : कोणीतीही व्यक्ती एकट्याच्या जोरावर यशस्वी होत नाही. त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेकांचे सहकार्य असते. मग ते प्रशिक्षक, पालक किंवा मित्र असो, यशाच्या शिखरावर असताना अशा व्यक्तीला विसरू नका. जर तुम्ही नम्र राहिलात, तर यश मिळविण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा मोलाचा सल्ला भारतीय महिला क्रिकेट संघाची सर्वात युवा खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज हिने युवा क्रिकेटपटूंना दिला.मुंबई क्रिकेटमधील प्रतिष्ठेची असलेल्या २८व्या कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे शनिवारी माटुंगा येथील रमेश दडकर मैदानात उद्घाटन झाले. १६ वर्षांखालील खेळाडूंसाठी असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जेमिमाच्या उपस्थितीमध्ये झाले. या वेळी मराठी अभिनेता अतुल परचुरे याचीही विशेष उपस्थिती होती.जेमिमाने युवा खेळाडूंशी संवाद साधताना म्हटले की, ‘माझा आतापर्यंतचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव खूप चांगला आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर आपण तांत्रिकदृष्ट्या सारखेच होतो. केवळ एका गोष्टीचा फरक आहे आणि तो म्हणजे, जो खेळाडू मानसिकदृष्ट्या सक्षम असलेले खेळाडू यशस्वी होतात. जर, तुम्ही मानसिकरीत्या कणखर होऊन सातत्यपूर्ण कामगिरी केली, तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आणि हीच बाब मला माझ्या प्रशिक्षकांनी शिकवली आहे.’२६ मे रोजीअंतिम सामनाप्रत्येक शनिवार - रविवार अशा दोन दिवशी रंगणाºया या स्पर्धेत कांदिवली, विरार, वांद्रे, कलिना, माटुंगा, बेलापूर आणि सानपाडा येथे विभागीय अंतर्गत सामने खेळविण्यात येतील.स्पर्धेचा अंतिम सामना दडकर मैदानात २६ मे रोजी होणार असून, या वेळी भारताचे विक्रमादित्य आणि लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात येईल.

टॅग्स :क्रिकेटमुंबई