Join us  

हार्दिक पांड्याची तुलना कपिल यांच्याशी करू नका - सौरभ गांगुली

विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी तर हार्दिकची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तेव्हापासून अनेकांनी हार्दिकच्या खेळाची तुलना कपिल यांच्या कामगिरीशी केली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 3:58 AM

Open in App

नवी दिल्ली: भारतीय संघातील मधली फळी गेल्या काही महिन्यात चांगला निकाल देत आहे. अनेक खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी करीत निवडकर्ते आणि चाहत्यांचे लक्ष वेधले. केदार जाधव, मनीष पांडे हार्दिक पांड्या असे प्रमुख खेळाडू चर्चेत आले.विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी तर हार्दिकची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तेव्हापासून अनेकांनी हार्दिकच्या खेळाची तुलना कपिल यांच्या कामगिरीशी केली. माजी कर्णधार सौैरव गांगुली यांनी मात्र हार्दिकची तुलना कपिल देव यांच्याशी करण्यात येऊ नये, असे मत मांडले. ‘इंडिया टुडे’शी बोलताना सौरवने स्वत:ची भूमिका मांडली. सौरव म्हणाला,‘ हार्दिकची तुलना कपिल यांच्यासोबत करण्यात येऊ नये. हार्दिक फार गुणी खेळाडू आहे. पण त्याला स्वत:मध्ये सुधारणा करण्यास वाव आहे. कपिल बनायला आणखी वेळ लागेल. कपिल देव हे सर्वार्थाने ‘महान’ आहेत. हार्दिक पुढील दहा वर्षे असाच खेळत राहिल्यास आपण कपिलशी त्याची तुलना करू शकू. सध्यातरी हार्दिकला खेळाचा आनंद घ्यायला हवा. भविष्यात हार्दिकने आणखी आक्रमक खेळावे. विराट कोहलीच्या नेतृत्वात हार्दिकचा खेळ अधिक बहरत आहे. त्यात आणखी सुधारणा घडून येईल,’ अशी आशा आहे.सध्या हार्दिकला खेळाचा आनंद घेऊ द्या. हार्दिकची तुलना महान खेळाडूशी इतक्या लवकर करुन त्याच्यावर विनाकारण दडपण आणले जाऊ नये, असे मतही गांगुली यांनी व्यक्त केले.भारत वर्चस्व गाजवेलआॅस्ट्रेलियाविरु द्धच्या वन-डे मालिकेत हार्दिक पांड्याला मालिकावीराचा किताब मिळाला होता. शनिवारपासून भारतीय संघ आॅस्ट्रेलियाशी टी-२० मालिकेत आमने- सामने येणार आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये हार्दिक कशी कामिगरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. आॅस्ट्रेलियानंतर भारत घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्याशी सामना करणार आहे. पण सध्याचा फॉर्म पाहता, दोन्ही संघांवर भारत एकतर्फी मात करेल, असे भाकितही सौरव गांगुलीने वर्तविले.

टॅग्स :क्रिकेटसौरभ गांगुलीएम. एस. धोनीबीसीसीआय