Join us  

आडनाव बदलू नकोस, रोहित शर्माने का दिला अनुष्का शर्माला हा सल्ला?

रोहित शर्मानेही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना शुभेच्छा दिल्या पण आपल्या हटके शुभेच्छांनी त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 2:17 PM

Open in App

मुंबई: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं लग्न झाल्याचं वृत्त आल्यापासून दोघांवर सर्वच स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचा सलामीचा फलंदाज आणि सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या रोहित शर्मानेही दोघांना शुभेच्छा दिल्या पण शुभेच्छा देताना केलेल्या मजेशीर ट्विटने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या ट्विटमध्ये त्याने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघांना सल्ला दिला आहे.

दोघांचं अभिनंदन त्याने या ट्विटमध्ये केलं आहे. विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन आणि अनुष्का तु आडनाव बदलू नकोस असं ट्विट रोहितने केलं आहे. रोहितचेही आडनाव शर्मा असल्याने अनुष्कालाही शर्मा हे नाव बदलू नकोस असा सल्ला त्याने गंमतीत दिला आहे.

अंगठी शोधायला विराटला लागले तीन महिने-

विराट-अनुष्काच्या लग्नासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ड्रेसपासून ते त्यांच्या दागिन्याचीही सध्या चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीबाबत रंजक माहिती समोर आली आहे. लग्नातील प्रत्येक गोष्ट खास होती. पण सर्वात खास गोष्ट म्हणजे विराटनं अनुष्काला दिलेली अंगठी. 

अनुष्कासाठीची अंगठी शोधण्यासाठी विराटला तब्बल तीन महिने लागले असल्याची चर्चा आहे. विराटनं अनुष्कासाठी जी अंगठी निवडली ती प्रचंड महागडी आणि खास आहे. या अंगठीमध्ये एक खास हिराही बसवण्यात आला आहे. ऑस्ट्रियाचा एका डिझायनरनं ही अंगठी तयार केली आहे. या अंगठीची खासियत म्हणजे, ही अंगठी तुम्ही जेवढ्या अँगलमधून पाहाल तितक्यांदा तिची डिझाइन वेगवेगळी दिसेल. या अंगठीची किंमत तब्बल 1 कोटी असल्याचीही चर्चा आहे. 

रिंग सेरेमनीत अनुष्काने वेल्वेट मरून साडी निवडली होती. साडीवर मोती आणि जरदोजी व मरोरी वर्क होते. यावेळी तिने घातलेल्या गळ्यातील सेटवर पर्ल चोकरसोबत डायमंडचे काम केले गेले होते. कानात मॅचिंग स्टड, केसांचा अंबाडा आणि त्यावर खोचलेले गुलाबाचे फुल अशा लूकमध्ये अनुष्का कमालीची सुंदर दिसत होती.

अनुष्काने लग्नात घातलेला लहंगा आणि दागिणेही असेच खास होते. अनुष्काचा लहंगा सब्यसाची यांनी डिझाईन केला होता. ६७ कारागिरांनी ३२ दिवस खपून तो तयार केला. पिंक कलरच्या या लहंग्यावर हाताने खास कढाई वर्क केले गेले होते.  विराटने लग्नात पांढ-या रंगाची शेरवानी घातली होती. यावर बनारसी कढाई काम केले गेले होते. शिवाय हस्तीदंताची विशेष कारीगिरी करण्यात आली होती. टसर फ्रॅबिकच्या स्टोलसह विराटने रोझ सिल्क चंदेरी पायजाम घातला होता.

टॅग्स :विराट अनुष्का लग्नविरूष्का वेडिंगविराट कोहली