Join us  

बाबांनो, Virat Kohliसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंका; भारताच्या माजी खेळाडूची टीम इंडियाला विनवणी 

हा वर्ल्ड कप विराट कोहलीसाठी ( Virat Kohli) अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या स्पर्धेनंतर तो टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 7:50 PM

Open in App

T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Round 1 मधील पहिल्याच सामन्यात ओमाननं १० विकेट्स राखून पापुआ न्यू गिनीचा पराभव करताना इतिहास घडवला. आता बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड असा सामना सुरू आहे. सुपर १२ चे सामने २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत आणि २४ ऑक्टोबरला भारत पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा वर्ल्ड कप विराट कोहलीसाठी ( Virat Kohli) अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या स्पर्धेनंतर तो टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्यामुळे विराटही आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. 

Suresh Raina pleads Team India to win WC भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानंविराट कोहलीसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंका, अशी विनवणी केली आहे. भारतानं २००७ साली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला होता आणि त्यानंतर टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली आहे. विराटला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. ''आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला मी एकच संदेश देऊ इच्छितो, तो म्हणजे विराट कोहलीसाठी जिंका. कर्णधार म्हणून त्याची ही अखेरची स्पर्धा आहे आणि त्यामुळे सर्वांनी मिळून त्याला विजयी गिफ्ट द्या. आपण हे करू शकतो, असा विश्वास त्यानं सहकाऱ्यांना दाखवला पाहिजे आणि आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं,''असे सुरेश रैना म्हणाला.  

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीवर विराटचं २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील कर्णधारपद अवलंबून राहणार आहे. मागील पाच वर्षांत त्यानं एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याला जेतेपदानं हुलकावणी दिली.   

भारतीय संघ - विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल. नेट गोलंदाज -  आवेश खान, उम्रान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद, के गौथम. 

भारतीय संघाचे वेळापत्रक२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता३१ ऑक्टोबर -   भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता३ नोव्हेंबर -    भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१विराट कोहलीसुरेश रैना
Open in App