Join us

ज्ञानेश्वर मोरघाचे विजेतेपद

ज्ञानेश्वर मोरघा आणि आरती पाटील यांनी आपआपल्या गटातील १० किमी अंतराची शर्यत जिंकताना पहिल्या ‘आय रन’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:01 IST

Open in App

मुंबई : ज्ञानेश्वर मोरघा आणि आरती पाटील यांनी आपआपल्या गटातील १० किमी अंतराची शर्यत जिंकताना पहिल्या ‘आय रन’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.नेत्रदान जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही शर्यत ठाण्यामध्ये पार पडली. स्वातंत्र्यदिनी झालेल्या या शर्यतीच्या पुरुष १० किमी अंतराच्या शर्यतीत ज्ञानेश्वरने ३१ मिनिटे ३८ सेकंद अशी वेळ नोंदवत वर्चस्व राखले. अमित माळीने ज्ञानेश्वरला कडवी लढत दिली. परंतु, मोक्याच्या वेळी वेगामध्ये सातत्य राखण्यात तो अपयशी ठरला. अमितने ३१ मिनिटे ४६ सेकंदांची वेळ नोंदवली. पिंटू कुमार यादवने ३२ मिनिटे ४९ सेकंदांची वेळ देत तृतीय स्थान पटकावले. महिलांच्या १० किमी शर्यतीमध्ये आरती पाटीलने एकहाती वर्चस्व राखताना ३८:४० मिनिटांची वेळ नोंदवत बाजी मारली. रिशु सिंगने ३८:५३ अशी, तर गीता वटगुरेने ३९:१४ मिनिटांची वेळ देत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.