Join us  

Dinesh Karthik Reply to Fans, IPL 2022: 'RCBसाठी आम्ही १००० किलोमीटर ड्राईव्ह करून आलोय...'; चाहतीच्या बॅनरला दिनेश कार्तिकचे झकास उत्तर

पहिले २ सामने गमावल्यावर RCBने जिंकले सलग चार सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 1:04 AM

Open in App

Dinesh Karthik Reply to Fans,IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने दिल्ली कॅपिटल्सला शनिवारच्या सामन्यात १६ धावांनी पराभूत केले. RCB कडून दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके ठोकत संघाला १८९ धावांची मजल गाठून दिली. प्रत्युत्तरात दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शानदार अर्धशतक ठोकले. कर्णधार रिषभ पंतनेही चांगली फटकेबाजी केली. पण अखेर बंगलोरचा विजय झाला. या सामन्यानंतर दिनेश कार्तिकने केलेले ट्वीट विशेष चर्चेत राहिले.

सामना सुरू असताना एक चाहतीच्या हातात एक बॅनर होता. त्यावर लिहिले होते की, आम्ही सामना पाहायला १००० किलोमीटर ड्राईव्ह करून या स्टेडियममध्ये आलो आहोत. आम्ही RCB साठी इतकं ड्राईव्ह केलं आहे. यावर्षी ही IPL ची ट्रॉफी आपल्या संघाला मिळवून द्या. एका व्हेरिफाईड ट्वीटर युजरने त्याचा फोटो पोस्ट केला होता आणि 'RCB चे चाहते' असे त्या फोटोला कॅप्शन दिले होते. त्यावर दिनेश कार्तिकने स्वत:च्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केले. त्याने लिहिले की, मला आशा आहे की तुम्ही आज इतक्या लांब ड्राईव्ह करून आलात, सामना पाहून तुम्हाला नक्कीच मजा आली असेल आणि तुमचा थकवा पळून गेला असेल.

दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगलोरचे चार चार गडी झटपट परतले होते. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने ३४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा केल्या. तो बाद झाल्यावर दिनेश कार्तिक आणि शाहबाजने फटकेबाजी केली. कार्तिकने ३४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६६ धावा कुटल्या. तर शाहबाजने २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. तो बाद झाल्यावर रिषभ पंतने फटकेबाजीला सुरूवात केली होती. पण १७ चेंडूत ३४ धावांवर खेळत असताना विराटने त्याचा उत्तम झेल टिपला. त्यानंतर मात्र दिल्लीला पराभव पत्करावा लागला.

टॅग्स :आयपीएल २०२२दिनेश कार्तिकरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली
Open in App