Join us  

दिनेश कार्तिक विश्वचषकात ‘फिनिशर’ची भूमिका वठवू शकतो

केकेआरचा माजी कर्णधार राहिलेल्या कार्तिकने यंदा ३२, १४, ४४, ७, ३४ आणि ६६ धावा ठोकल्या असून यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २०९.५७ आणि सरासरी १९७ इतकी राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:07 AM

Open in App

मुंबई : आयपीएल १५ मध्ये शानदार फॉर्ममध्ये असलेला अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक हा आगामी टी-२० विश्वचषकात भारतासाठी फिनिशरची भूमिका बजावू शकतो. मधल्या तसेच तळाच्या स्थानावर झटपट धावा काढण्यात तो तरबेज असल्याचे मत दिग्गज सुनील गावसकर यांनी मंगळवारी मांडले.कार्तिक हा २०२२ मध्ये आरसीबीसाठी खेळत आहे. तो निडरपणे खेळून धावा काढतो. केकेआरचा माजी कर्णधार राहिलेल्या कार्तिकने यंदा ३२, १४, ४४, ७, ३४ आणि ६६ धावा ठोकल्या असून यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २०९.५७ आणि सरासरी १९७ इतकी राहिली. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले, ‘कार्तिक टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात पुनरागमन करू इच्छितो.  

टॅग्स :दिनेश कार्तिकआयपीएल २०२२
Open in App