Angkrish Raghuvanshi Does Perfect Heart-Shaped Celebration After Fifty : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील १५ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील २० वर्षीय अंगकृष्ण रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) याने आपल्या भात्यातील धमक दाखवली. ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत असताना त्याने अर्धशतक साजरे केले. अर्धशतकी खेळीनंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२० वर्षीय पोरानं लुटली मैफिल
सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. क्विंटन डी कॉक आणि सुनील नरेन दोघेही स्वस्तात माघारी फिरले. १६ धावांवर २ विकेट्स गमावल्यावर अंगकृष्ण रघुवंशीनं कर्णधार अजिंक्य रहाणेच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.
IPL 2025 : Kamindu Mendis नं दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याचं कसब दाखवलं; अन् विकेटही घेतली (VIDEO)
"दिल से रे..." रघुवंशीनं खास अंदाजात केल सेलिब्रेशन
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे २७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ३८ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर अंगकृष्ण रघुवंशीनं ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५० धावांची खेळी केली. अर्धशतक साजरे केल्यावर त्याने आपल्यावर भरवसा ठेवणाऱ्या मंडळींचे त्याने मनापासून आभार मानले. कोलकाताच्या डावाला आकार देणाऱ्या अर्धशतकानंतर हार्टशेप सेलिब्रेशनसह त्याने मैफिल लुटली. त्याच्या अर्धशतकासह ड्रेसिंग रुमकडे पाहत त्याने केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे.
अंगकृष्ण रघुवंशीचा IPL मधील दुसरी फिफ्टी
अंगकृष्ण रघुवंशी हा युवा भारतीय अनकॅप्ड खेळाडू २०२४ च्या हंगामापासून कोलकाताच्या ताफ्यात आहे. गत हंगामात त्याला १० सामन्यात संधी मिळाली होती. ज्यात त्याने एका अर्धशतकासह १६३ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या यंदाच्या मेगा लिलावात ३ कोटींसह कोलकाताच्या संघाने पुन्हा त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. यंदाच्या हंगामात पहिल्यापासून तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळतोय. चौथ्या सामन्यात त्याने यंदाच्या हंगामातील पहिले आणि आयपीएलमधील दुसऱे अर्धशतक साजरे केले. गत हंगामात केलेली ५४ धावांची खेळी त्याची आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोच्च खेळी आहे.
Web Title: IPL 2025 KKR vs SRH 15th Match Kolkata Knight Riders 20 Year Old Batter Angkrish Raghuvanshi Does Perfect Heart Shaped Celebration After Fifty Against Sunrisers Hyderabad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.