Join us

इरफान पठाण अन् हरभजन सिंग यांचा MS Dhoniला वाढत्या वयावरून अप्रत्यक्ष टोला? ट्विटने उंचावल्या भुवया

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांच्य ट्विट्सनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

By स्वदेश घाणेकर | Updated: October 3, 2020 22:09 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांच्य ट्विट्सनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोघांनी ट्विटच्या माध्यमातून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याला अप्रत्यक्ष टोला लावल्याची चर्चा रंगली आहे. इरफाननं ( Irfan Pathan) जानेवारी 2020मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर हरभजन सिंग ( Harbhajan Singh) 2016पासून टीम इंडियाकडून खेळलेला नाही.  

इरफान 2012मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा खेळला होता आणि त्यानंतर त्याला संघातून कॉल आलाच नाही. या काळात तो स्थानिक क्रिकेट आणि Indian Premier League मध्ये खेळत होता. दरम्यान भज्जीची क्रिकेट कारकीर्द सुरु होती, परंतु आता तीही संपुष्टात आल्यात जमा आहे.  त्यानं 2016मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला. त्यानं 2015 मध्ये अखेरचा वन सामना खेळला. त्या वर्षात त्यानं 7 सामने खेळले. शनिवारी इरफान आणि भज्जी यांच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले. 

सनरायझर्स हैदराबाच्या ( SRH) 5 बाद 164 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जाडेजानं पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारी केली. मात्र एका बाजूला आवश्यक धावगती वाढत होती. त्यामुळे मोठे फटके मारणं गरजेचं आहे. जाडेजानं ३५ चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली. मात्र फटकेबाजी करताना तो बाद झाला. धोनीनं मोठे फटके मारण्यास सुरुवात केली तेव्हा उशिरा झाला होता. धोनी ३६ चेंडूंत ४७ धावा काढून नाबाद राहिला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १५७ धावाच करता आल्या.  

या सामन्यानंतर इरफाननं ट्विट केलं की,''काही लोकांसाठी वय हे केवळ नंबर आहे आणि काहींसाठी संघातून हकालपट्की करण्याचं कारण.'' इरफानच्या या ट्विटचा संदर्भ धोनीच्या संथ खेळीशी लावण्यात आला. हरभजन सिंगनेही इरफानच्या ट्विटवर कमेंट करताना लिहिलं की,''10000000 टक्के तुझ्याशी सहमत.''  

 

टॅग्स :IPL 2020हरभजन सिंगइरफान पठाणमहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबाद