Join us  

वर्ल्ड कप अपयशानंतर पाकिस्तानी खेळाडूंसाठी डाएट प्लान; येणार बिर्याणीवर संक्रांत

नुकताच पार पडलेल्या विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 12:00 PM

Open in App

मुंबई: नुकताच पार पडलेल्या विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत देखील पाकिस्तान संघ मजल न मारु शकल्याने पाकिस्तानच्या प्रेक्षकांना हे चांगलेच जिव्हारी लागले होते. त्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमदसह इतर खेळाडूंवर फिटनेसच्या बाबतीत पाकिस्तानच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी टीका केली होती. 

त्यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंचे डाइट प्लॅन बदलणार असल्याचे बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान यांनी दिली. तसेच खेळाडूंना बिर्याणी व डाळ भातच्या व्यतिरिक्त इतर पदार्थ देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

वसीमने सांगितले की, खेळाडूंवर फिटनेसच्या बाबतीत खूप टीका झाली. तसेच पाकिस्तानचे खेळाडू अनफिट असल्याचा छिक्काच मारल्याने खेळाडूंना मानसिकरित्या मजबूत करण्याची गरज आहे. तसेच पाकिस्तान टीमचा इतिहास खूप चांगला होता. तसेच पाकिस्तान टीमची नेहमीच प्रबळ संघ म्हणून ओळख असल्याचे त्यांनी डॅानला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

तसेच पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला देखील पुरुष संघाच्या बरोबरीने कसे आणता येईल त्यावर काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तान