दाम्बुला : माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी गुरुवारी भारताच्या वन-डे आंतरराष्ट्रीय स्पेशालिस्ट खेळाडूंसोबत सराव सत्रात सहभागी झाला होता. ऐच्छिक सत्रात धोनी, केदार जाधव, मनीष पांडे, शार्दूल ठाकूर, यजुवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांनी सहभाग नोंदवला.
आकर्षणाचा केंद्रबिंदू मात्र धोनी होता. धोनीने आज भारतीय व स्थानिक श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर सराव केला. त्यामुळे सुरुवातीला तो फॉर्मात नसल्याचे भासत होते, पण नजर बसल्यानंतर मात्र त्याने वेगवान व फिरकीपटूंविरुद्ध काही आकर्षक फटके खेळत वन-डे मालिकेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. (वृत्तसंस्था)