Join us  

धोनीचे टीकाकारांना सडेतोड उत्तर; भुवनेश्वरची कामगिरी लक्षवेधक

कसोटी मालिकेनंतर भारताने एकदिवसीय मालिकाही जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 3:38 AM

Open in App

- अयाझ मेमनकसोटी मालिकेनंतर भारताने एकदिवसीय मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच भारतीय संघाने अशी कामगिरी केली. भारतासाठी हा दौरा सर्वाेत्तम राहिला. तिन्ही एकदिवसीय सामने जबरदस्त झाले. या सामन्यांत भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन कसे राहिले त्यावरचा हा संक्षिप्त रिपोर्ट कार्ड....>विराट कोहली/८.५/१०दुसऱ्या सामन्यात शानदार शतकाने मालिका बरोबरीवर आणली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याचा आक्रमकपणा पाहाता आॅस्ट्रेलियाला क्लिन स्वीपचा विचार दिसत होता. पावसामुळे टी-२० मालिका बरोबरीवर राहिली अन्यथा तीसुद्धा जिंकण्याचा विराटचा मानस होता. (८.५/१०)>रोहित शर्मा/८/१०पहिल्या सामन्यात शतक झळकाविले. मात्र, सामना जिंकता आला नाही. पांढºया चेंडूवर त्याच्यातील उत्तमता चमकून दिसली. जेव्हा तो पूर्ण लयीत असतो तेव्हा विरोधकांचा कर्दनकाळ ठरतो.>शिखर धवन/६/१०संघाला सुरुवातीस मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात अपयशी ठरला. मात्र, तो पुन्हा लयीत येणार, अशा विश्वास निर्माण केला. पण शिखर मोठी धावसंख्या करू शकला नाही.>अंबाती रायडू/३/१०दोन सामन्यांत फलंदाजीत प्रभाव टाकू शकला नाही. विश्वचषकासाठी धोनीच्या जागी चौथ्या क्रमांकावर रायडूचे स्थान अनिश्चित आहे. न्यूझीलंडमध्ये तो संधीचा फायदा कसा उठवतो ते पाहावे लागेल.>महेंद्रसिंह धोनी/९/१०स्ट्राईकरेटवरून टीका करणाºयांना सडेतोड उत्तर दिले. त्याने सलग तीन अर्धशतके झळकाविली. यातील दोन अर्धशतके ही सामने जिंकून देणारी ठरली. तो एखाद्या ग्रॅण्डमास्टरप्रमाणे डाव पुढे नेतो.>दिनेश कार्तिक/७/१०आघाडीच्या फलंदाजांनी धावा केल्यामुळे फलंदाजीची जास्त संधी मिळाली नाही; पण मध्यभागात काही वेळ घालवत योगदान दिले. एक फिनिशर म्हणूनही त्याने भूमिका बजावली.>केदार जाधव/८/१०तिसºया सामन्यात धोनीसोबत खेळताना अर्धशतकीय खेळी केली. फलंदाजीने प्रभावित केले. पार्टटाइम गोलंदाज आणि यष्टीमागेही कामगिरी बजावू शकतो. एक बहुपर्यायी खेळाडू.>रवींद्र जडेजा/६.५/१०मालिकेत इतका यशस्वी ठरला नाही. एकदा फलंदाजी केली आणि दोन बळी घेतले. मात्र, धावगती रोखण्यात उत्तम भूमिका बजावली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणही केले.>भुवनेश्वर कुमार/९/१०धोनीप्रमाणेच संपूर्ण मालिकेवर कोणी छाप सोडली असेल तर तो भुवनेश्वर कुमार आहे. त्याने मालिकेत सर्वाधिक बळी घेतले. गोलंदाजीबरोबरच उपयुक्त फलंदाजी करून आपली योग्यता सिद्ध केली.>मोहम्मद शमी/७.५/१०आतापर्यंतचा शमीचा हा यशस्वी दौरा. बुमराह आणि भुवनेश्वरसारखे प्रतिभावंत गोलंदाज असतानादेखील दुखापतीनंतर यशस्वी पुनरागमन. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा अविभाज्य घटक.>कुलदीप यादव/५.५/१०कुलदीप यादव : कसोटीपर्यंतच आपले यश मर्यादित न ठेवता एकदिवसीय मालिकेतही आॅसींना आपल्या फिरकीवर अक्षरश: नाचविले; पण त्याला अधिकाधिक सामने खेळविणे गरजेचे होते.>युझवेंद्र चहल/८/१०केवळ अखेरच्या सामन्यात संधी मिळूनही त्या संधीचे खºया अर्थाने सोने केले. ६ बळी टिपून आपण संघात असणे का गरजेचे आहे, हे या प्रतिभावंत लेगस्पिनरने दाखवून दिले.>सिराज/अहमद/३/१०मोहम्मद सिराज/खलील अहमद : या उदयोन्मुख गोलंदाजांना प्रत्येकी एक-एक सामना खेळायला मिळाला. त्यामुळे त्यांना वाव मिळाला नाही. आपल्या चुकांमधून नक्कीच त्यांना शिकता आले असेल.>विजय शंकर/३/१०या अष्टपैलू खेळाडूला हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत स्वत:ला सिद्ध करण्याची एक नामी संधी प्राप्त झाली आहे. न्यूझीलंड दौरा त्याच्यासाठी कदाचित यशाचे ते द्वार खोलू शकतो.(संपादकीय सल्लागार)