Join us  

युवा खेळाडूंना संधी देऊ; धोनी म्हणतो, रणनीती बदलण्याची हीच योग्य वेळ

एकसारखा संघ खेळविण्याच्या संघाच्या डावपेचात काही बदल होईल काय,असा सवाल करताच फ्लेमिग म्हणाले,‘माझ्यामते बदल करण्याची हीच वेळ आहे.तीनवेळेचा विजेता असलेला आमचा संघ यंदा कामिगरीत माघारत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 10:33 AM

Open in App

अबुधाबी : चेन्नई सुपरिकंग्सच्या आगामी सामन्यांसाठी संघाच्या तीत बदल करण्याची  हीच वेळ असून यापुढील सामन्यांसाठी युवा खेळाडूंना संधी दिली जाईल,असे कर्णधार महेंद्रिसंग धोनी आणि मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी राजस्थान रॉयल्सकडून झोल्या पराभवानंतर सांगितले.दहा सामन्यात सात पराभव आणि तीन विजयामुळे सहा गुणांसह गुण तालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या चेन्नईने युवा खेळाडूंना आजमावण्याचे बेत आखले आहेत. तथापि एकाही भारतीय खेळाडूृत आवश्यक जोष दिसत नसल्याचे मत फ्लेमिंग आणि धोनी यांनी नोंदवले. या संघाच्या प्ले ऑफच्या आशा आता जवळपास मंदावल्या आहेत. २३ ऑक्टोबर रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्सिवरुद्ध त्यांचा पुढील सामना होईल.

एकसारखा संघ खेळविण्याच्या संघाच्या डावपेचात काही बदल होईल काय,असा सवाल करताच फ्लेमिग म्हणाले,‘माझ्यामते बदल करण्याची हीच वेळ आहे.तीनवेळेचा विजेता असलेला आमचा संघ यंदा कामिगरीत माघारत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. ’धोनीने मात्र स्वत:चा बचाव करताना सांगितले की,आम्हाला एखाद्या  युवा खेळाडूला खेळवणे भाग पडावे अशी जोषपूर्ण कामिगरी अद्याप कुठल्याही भारतीय खेळाडूने केलेली नाही.वारंवार बदल करणे हितावह नसते. ड्रेसिंगरुममध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागावी,असे मला देखील वाटत नाही.युवा खेळाडूने काहीच प्रभाव टाकला नाही, की ज्यामुळे आम्ही त्याला खेळिवण्यास बाध्य होऊ.येत्या काही सामन्यात युवा खेळाडूंना संधी देऊ, पण त्यांना दडपण झुगारुन खेळावेच लागेल.’ संथ खेळपट्टीवर रॉयल्सच्या िफरकी गोलंदाजांना लय गवसल्यामुळेच चेन्नईला अपेक्षित धावा करता आल्या नाहीत,असे फ्लेमिंग यांनी सांगितले. 

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीआयपीएलचेन्नई सुपर किंग्स