Join us

धोनी रन आउट, भारत वर्ल्डकपमधून आउट

सेमी फायनलमध्ये चौथ्यांदा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 06:52 IST

Open in App

मँचेस्टर : आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी सेमीफायनल जिंकण्याच्या आशा जिवंत केल्या खऱ्या, पण जडेजानंतर अत्यंत महत्त्वाच्या क्षणी धोनी रन आउट झाला आणि टीम इंडियाही वर्ल्डकपमधून आउट झाली. भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांनी पराभव झाला. भारतावर सलग दुसºया व आतापर्यंत चौथ्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पराभव पत्करण्याची वेळ आली.

पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस रंगलेल्या या ‘एकदिवसीय’ सामन्यात न्यूझीलंडने भारतापुढे २४० धावांचे आव्हान दिले. मात्र, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली हे स्टार फलंदाज अवघी एक धाव काढून ‘लुप्त’ झाले आणि भारताच्या पराभवाची चाहूल लागली. धोनी आणि ‘सर’ रवींद्र जडेजा यांनी ११६ धावांची निर्णायक भागीदारी करून भारताला ६ बाद ९२ धावा अशा प्रतिकूल स्थितीतून विजयी मार्गावर आणले, परंतु मोक्याच्या वेळी दोघेही बाद झाले. भारतीय संघाचा डाव ४९.३ षटकात २२१ धावांत संपुष्टात आणून किवी फायनलमध्ये पोहोचले.धोनी गेला अन् चाहत्यांचे चेहरेच पडलेभारताला जिंकण्यासाठी १० चेंडूत २४ धावांची गरज होती. धोनी स्ट्राइकवर होता. दुसºया बाजूला भुवनेश्वर कुमार होता. धोनीने फर्ग्युसनच्या बाउंसरवर फटका लगावला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेत असताना गुप्टिलचा थ्रो थेट स्टम्पवर लागला. धोनी रन आउट झाला अन् चाहत्यांचे चेहरेच पडले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीवर्ल्ड कप 2019