Join us  

लष्कराच्या वर्दीमध्ये धोनीने का स्वीकारला पद्मभूषण पुरस्कार, जाणून घ्या

या सोहळ्यात धोनी जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. कारण धोनी यावेळी लष्कराच्या वर्दीमध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला होता. तेव्हा बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केले की, लष्कराच्या वर्दीमध्ये धोनी कसा काय हा पुरस्कार स्वीकारू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 4:56 PM

Open in App
ठळक मुद्देधोनीने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर पद्म भूषण पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सोमवारी पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रपती भवनात पद्म भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात धोनी जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. कारण धोनी यावेळी लष्कराच्या वर्दीमध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला होता. तेव्हा बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केले की, लष्कराच्या वर्दीमध्ये धोनी कसा काय हा पुरस्कार स्वीकारू शकतो.

धोनीने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर पद्म भूषण पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये धोनीने लिहीले आहे की, " पद्म भूषण पुरस्कार मिळणे, हा माझा बहुमान आहे आणि हा पुरस्कार लष्कराच्या वर्दीमध्ये स्वीकारताना माझा आनंद दहा पटीने वाढला आहे. या वर्दीमध्ये राहून देशाची सेवा करणाऱ्या जवानांचे धन्यवाद. तुमच्यामुळेच देशातील जनता सुरक्षित राहू शकते. "

पद्म भूषण हा देशातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. यापूर्वी धोनीला 2007 साली राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर 2009 साली धोनीला पद्मश्री पुरस्काने गौरवण्यात आले होते.

भारताच्या लष्कराने धोनीला मानद लेफ्टनंट कर्नल पद दिलेले आहे. त्यामुळे धोनीने पद्म भूषण पुरस्कार स्वीकारताना लष्कराची वर्दी परीधान केली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक जिंकला होता आणि त्याच दिवशी त्याचा पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनी