Join us  

आयपीएलनंतर धोनी ‘या’ टी-२० लीगमध्ये खेळण्याची शक्यता

एका इंग्लिश वेबसाईटने दिलेल्या वृत्तनुसार ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमधील (BBL) अनेक फ्रेंचाईजी धोनीला करारबद्ध करुन घेण्यास उत्सुक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 2:54 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) सत्रात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. यंदा त्यांना केवळ ३ सामनेच जिंकता आले असून गुणतालिकेत ते तळाच्या स्थानी आहेत. प्ले ऑफच्या अंधुक आशा कायम ठेवण्यासाठी चेन्नईला आपल्या उर्वरीत ४ सामन्यांत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. त्यातच त्यांचा आज सामना फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) होणार आहे. त्यामुळेचे चेन्नईची वाटचाल अधिक बिकट झाली आहे. यादरम्यानच कर्णधार महेंद्रसिंग धोनीआयपीएलनंतर अन्य एका टी-२० लीगमध्ये खेळण्याची शक्यता दिसत आहे.

एका इंग्लिश वेबसाईटने दिलेल्या वृत्तनुसार ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमधील (BBL) अनेक फ्रेंचाईजी धोनीला करारबद्ध करुन घेण्यास उत्सुक आहेत. केवळ धोनीच नाही, तर सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनाही आपल्यासह करारबद्ध करुन घेण्यास अनेक फ्रेंचाईजींमध्ये चढाओढ रंगली आहे. बीबीएलच्या नव्या नियमानुसार आता संघात दोन ऐवजी तीन परदेशी खेळविण्याची मुभा आहे. त्यामुळेच आता या लीगमधील फ्रेंचाईजींची नजर अनेक विदेशी खेळाडूंवर असून यामध्ये धोनी आघाडीवर आहे.

धोनी, रैना आणि युवराज यांच्यारुपाने फ्रेंचाईजी संघांना अनुभवी खेळाडूंसह एक उत्तम ब्रँड व्हॅल्यू असलेले खेळाडूही मिळतील. मात्र असे असले, तरी या तिन्ही स्टार खेळाडूंसाठी बीसीसीआयची नियमावली अडचण ठरु शकते. युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली असली, तरी धोनी आणि रैना अद्यापही आयपीएलमध्ये सक्रीय आहेत. त्याचवेळी, डिसेंबरमध्ये होणाºया बीबीएलदरम्यान हे तिन्ही खेळाडू व्यस्त नसतील. शिवाय यादरम्यान भारतीय संघही आॅस्टेÑलिया दौºयावर असणार. मात्र या तिन्ही खेळाडूंना बीबीएलमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयकडून एनओसी घ्यावी लागेल. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल