Join us

धोनी-कोहलीचे ‘ट्युनिंग’ लक्षवेधी; मैदानावरील या दोघांतील ताळमेळ जबरदस्त

दोेन गोष्टी आहेत ज्याचा स्ट्राईक रेट आणि सरासरीशी काहीही संबंध नाही. ज्याने या मालिकेत माझे लक्ष वेधले. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज मालिकेत विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील आपापसातील ‘ट्युनिंग’ थक्क करणारे आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 03:49 IST

Open in App

- हर्षा भोगले लिहितात...दोेन गोष्टी आहेत ज्याचा स्ट्राईक रेट आणि सरासरीशी काहीही संबंध नाही. ज्याने या मालिकेत माझे लक्ष वेधले. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज मालिकेत विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील आपापसातील ‘ट्युनिंग’ थक्क करणारे आहे. मैदानावरील या दोघांतील ताळमेळ जबरदस्त होता.तुम्ही जेव्हा कर्णधार म्हणून बराच काळ घालवला असेल आणि आता त्या भूमिकेत नसाल तेव्हा तुम्ही मिडविकेटवर राहून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करता. जेव्हा तुम्ही यष्टिरक्षक असता तेव्हा असे करता येत नाही. पण या दौºयात वेगळे चित्र पाहायला मिळाले. विराट कोहली नेहमी धोनीशी बातचीत करताना दिसला.बरेचदा तो ऐकण्याची भूमिकाही पार पाडत असतो. धोनीच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ठरवताना दिसतो. हे करताना बुमराहसारख्या तरुण गोलंदाजांनाही विश्वासात घेतो.चहल, यादव यांनी गोलंदाजी केल्यानंतर त्यांच्याशी तो बोलताना दिसतो. त्याचा गोलंदाजांसोबत असलेला हा ताळमेळही उल्लेखनीय आहे. माजी कर्णधाराकडून नैसर्गिकरीत्या अशी प्रेरणा घेणे महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे लक्ष देत त्याला परिस्थितीनुसार सल्ला देण्याचे कामही विराट उत्कृष्टपणे करीत आहे. यासाठी तो धोनीची मदत घेतो. एखाद्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असते. (पीएमजी)

टॅग्स :क्रिकेट