Join us  

धोनीने दिला मोहम्मद शामीला महत्वाचा सल्ला

हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी गुरफटत चालला होता. पण यामधून त्याला बाहेर काढण्याचे काम केले आहे भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 7:51 PM

Open in App
ठळक मुद्देशामीने धोनीचा हा सल्ला फक्त ऐकलाच नाही, तर प्रत्यक्षातही उतरवला.

नवी दिल्ली : पत्नी हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी गुरफटत चालला होता. पण यामधून त्याला बाहेर काढण्याचे काम केले आहे भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने. शामीला यावेळी धोनीने महत्वाचा सल्ला दिला आहे आणि धोनीचा हा सल्ला शामीनेही मानला आहे.

हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. पण आता तर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती. बीसीसीआयने शामीला आपल्या कारारातून वगळले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने शामीची चौकशी केली होती. पण बीसीसीआयने मात्र त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे.

हसीनने केलेल्या आरोपांतून बाहेर पडण्यासाठी शामीने धोनीशी संपर्क साधला. यावर धोनीने शामीला सल्ला दिला की, " हे सारे प्रकरण डोक्यातून काढून टाक. या साऱ्या गोष्टींपायी तुझ्यातले क्रिकेट संपू देऊ नकोस. काही दिवसांनी आयपीएलला सुरुवात होणार आहे, त्यामुळे तू मैदानात जाऊन सरावाला सुरुवात कर. "

शामीने धोनीचा हा सल्ला फक्त ऐकलाच नाही, तर प्रत्यक्षातही उतरवला. काही स्थानिक खेळाडूंना साथीला घेत त्याने गोलंदाजीच्या सरावाला सुरुवात केली आहे. आपण सराव करत असल्याचा व्हीडिओ त्याने समाजमाध्यमांवर पोस्ट केला आणि चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला.

टॅग्स :मोहम्मद शामीमहेंद्रसिंह धोनीआयपीएल