Join us  

अन् कर्णधार विराट कोहलीची पाठराखण केली धोनीनं, BCCIच्या आडचणीत वाढ

भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधार विराट कोहलीचे समर्थन केले. आफ्रिका दौ-यासाठी धोनी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 8:44 PM

Open in App

कुंजेर : दक्षिण आफ्रिकेसारख्या महत्त्वाच्या दौ-यासाठी परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेण्यासाठी भारतीय संघाला वेळेची आवश्यकता आहे, असे सांगत भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधार विराट कोहलीचे समर्थन केले. आफ्रिका दौ-यासाठी धोनी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात असेल.

दक्षिण आफ्रिकासारख्या दौऱ्यासाठी परिस्थितीशी अनुकूल होण्यासाठी संघाला सरावासाठी जास्त कालावधीची गरज असल्याचे तो म्हणाला. ​ 'कोणत्याही मालिकेच्या तयारीसाठी किमान एका महिन्याचा वेळ मिळायला हवा. पण तो मिळत नाही. नाईलाजानं आम्हाला मिळेल त्या वेळात तयारी करावी लागते. या साऱ्याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतोय,' असं विराट म्हणाला होता. त्याच्या याच मुद्द्याचं धोनीने समर्थन केलं. श्रीनगरहून ३५ कि.मी. अंतरावर उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात, कुझनेर क्रिकेट मैदानावर चिनार क्रिकेट प्रिमियर लीग सुरू आहे. तेथे धोनी प्रमुख पाहुणा म्हणून गेला होता. त्यावेळी तो पत्रकारांशी बोलत होता.

काहीदिवसांपुर्वीच कोहलीने भारतीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकावर वक्तव्य केले होते. धोनीने म्हटले की, ‘कोहलीचे म्हणणे बरोबर आहे. आम्ही इतके क्रिकेट खेळतो की, जेव्हा आम्ही विदेशात जातो, तेव्हा आम्हाला तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हे एक आव्हान आहे.’ कोहलीचे समर्थन करताना धोनी म्हणाला की, ‘परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी काहीसा वेळ लागतोच, मात्र सध्याच्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडू विदेशात खेळलेले असल्याने त्यांचा अनुभवाचा खूप फायदा होईल. जर त्यांना ८ ते १० दिवस जरी मिळाले तरी पुरेसे ठरतील. मात्र, जे काही दिवस मिळतील, त्यात भारतीय खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करतील.

 

टॅग्स :एम. एस. धोनीविराट कोहलीबीसीसीआय