Join us  

धवन, विजयची शतके; मात्र नंतर फलंदाजी ढेपाळली

सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे स्वागत शतके ठोकून केले. पावसाच्या व्यत्ययात सुरू झालेल्या या ऐतिहासिक सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ७८ षटकांत ६ बाद ३४७ धावा उभारल्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 2:12 AM

Open in App

बेंगळुरु  - सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे स्वागत शतके ठोकून केले. पावसाच्या व्यत्ययात सुरू झालेल्या या ऐतिहासिक सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ७८ षटकांत ६ बाद ३४७ धावा उभारल्या. अखेरच्या सत्रात मात्र पाहुण्या गोलंदाजांनी छाप सोडली.धवनने केवळ ९६ चेंडूत १०७ तसेच विजयने १५३ चेंडूत १०७ धावा ठोकल्या. दोघांनी २८.४ षटकांत १६८ धावांची भर घातली. दोघेही बाद होताच कसोटीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताने अखेरच्या ३२ षटकांत ९९ धावांत पाच फलंदाज गमावले. अहमदजईने ३२ धावांत दोन आणि वफादारने ५३ धावांत एक गडी बाद केला. विजय आणि लोकेश राहुल यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी केली. कर्णधार अजिंक्य रहाणे ४५ चेंडू खेळला पण त्याला दहा धावा काढता आल्या. चेतेश्वर पुजारा ३५ धावा काढून परतला. रणानेला राशिद खानने पायचित करीत कसोटीत पहिल्या बळीची नोंद केली. आघाडीच्या फळीने केलेली झकास सुरुवात कायम राखण्यात मधल्या फळीला अपयश आले. दिनेश कार्तिक धावबाद झाला.पहिल्या सत्रातील ४५ षटकांत ३७ चौकार व चार षटकारांची नोंद झाली. यावरुन अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची परीक्षा सुरू झाली असून त्यांना मोठा प्रवास करावा लागेल, हे दिसून आले. लाल चेंडूवर राशिदने धवनला अनेकदा फ्लाईट करण्याचा प्रयत्न केला. त्यावर धवनने वारंवार चौकार मारले. अहमदजईने सुरुवातीला टिच्चून मारा केला. अनेकदा आऊटस्विंगरवर त्याने भारतीय फलंदाजांना चकविले. वफादारला देखील सुरुवातीस विजय सावध खेळला पण स्थिरावताच त्याने १५ चौकारआणि एका षटकारासह १२ वे शतक गाठले.कसोटी पदार्पण करणारा १२ वा देश असलेल्या अफगाणिस्तानची कमाल पाहण्यासाठी आयसीसीचे अधिकारी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)शिखरचाअनोखा विक्रमशिखर धवनने अनोख्या विक्रमाची नोंद केली. कसोटी क्रिकेटमध्ये उपहाराआधीच शतक झळकावणारा शिखर धवन पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी पाच खेळाडूंनी अशी करामत केली. यादीत शिखरने सहावे स्थान पटकावले. शिखरने उपहारापर्यंत नाबाद १०४ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये १९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. १०७ धावांवर तो बाद झाला.धावफलकभारत पहिला डाव : मुरली विजय पायचित गो. वफादार १०५, शिखर धवन झे. नबी गो. अहमदजई १०७, लोकेश राहुल त्रि. गो. अहमदजई ५४, चेतेश्वर पुजारा झे. नबी गो. मुजीबूर रहमान ३५, अजिंक्य रहाणे पायचित गो. राशिद १०, दिनेश कार्तिक धावबाद ४, हार्दिक पांड्या खेळत आहे १०, रविचंद्रन अश्विन खेळत आहे ७, अवांतर १५, एकूण: ७८ षटकांत ६ बाद ३४७ धावा.गडी बाद क्रम : १/१६८, २/२८०, ३/२८४, ४/३१८, ५/३२८, ६/३३४.गोलंदाजी : अहमदजई १३-६-३२-२, वफादार १५-४-५३-१, नबी ८-०-४५-०, राशिद २६-२-१२०-१, मुजीबूर रहमान १४-१-६९-१, स्टानिकजई २-०-१६-०.हा गर्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. अफगाणिस्तानने आव्हानात्मक आणि कठीण परिस्थितीचा सामना करीत खेळात गुणवत्ता मिळविली आहे. आव्हानांचा सामना करण्यात या संघाची समर्पित भावना, एक उद्देश, एकजुट आणि राष्टÑाच्या शांतीची आकांक्षा जाणवते. क्रिकेटच्या माध्यमातून भारत आणि अफगाणिस्तान एका शृंखलेत बांधले गेले, याबद्दल अभिमान वाटतो.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारतदेशाचा राष्टÑपती या नात्याने भारताविरुद्ध कसोटी पदार्पणाचे मी स्वागत करतो. दीर्घकाळापासून अफगाणिस्तानात क्रिकेट वाढविणाºया लोकांच्या कर्तृत्वावर मला गर्व वाटतो. अफगाणिस्तान एक दिवस जगातील सर्वोत्कृष्ट संघांविरुद्ध खेळेल, असा विश्वास बाळगणाºयांची स्वप्नपूर्ती झाली आहे.-अशरफ गनी, राष्टÑपती अफगाणिस्तान 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघक्रिकेटबीसीसीआय