Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा धवलने शूज दिले; शार्दूल ठाकूर, माझ्यासाठी भावुक क्षण

शार्दूलने रणजी अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केल्यानंतर गोलंदाजीत एक महत्त्वपूर्ण बळी घेत मुंबईला विदर्भाविरुद्ध पुनरागमन करून दिले होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2024 08:09 IST

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : 'धवल कुलकर्णी आपला अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळत असून, हा आमच्यासाठी भावनिक क्षण आहे. मी त्याच्याकडून खूप शिकलो असून, जेव्हा माझ्याकडे शूज घेण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा त्याने मला शूज दिले होते,' अशी भावुक प्रतिक्रिया मुंबईचा स्टार अष्टपैलू शार्दूल ठाकूर याने व्यक्त केली.

शार्दूलने रणजी अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केल्यानंतर गोलंदाजीत एक महत्त्वपूर्ण बळी घेत मुंबईला विदर्भाविरुद्ध पुनरागमन करून दिले होते. धवलनेही पहिल्या डावात तीन बळी घेत विदर्भाला जबर धक्के दिले. धवलच्या अखेरच्या सामन्याबाबत शार्दूल म्हणाला की, 'धवल त्याच्या अखेरच्या सामन्यात खेळतोय आणि हा त्याच्यासह माझ्यासाठीही भावनिक क्षण आहे. मी त्याला लहानपणापासून बघत आलोय. त्याने माझी गोलंदाजी सुधारण्यासाठी मदत केली. त्याने मला शूज घेण्यासाठी पैसे दिले होते. धवलने माझी खूप मदत केली आहे.' असेही तो म्हणाला.

टॅग्स :शार्दुल ठाकूर