Join us  

देवदत्तचा कोरोना अन्‌ राजस्थानवरही विजय

आरसीबीची दहा गड्यांनी ‘रॉयल’ बाजी; विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 4:16 AM

Open in App

- अयाज मेमनमुंबई : कोरोनावर मात करून परतलेला देवदत्त पडिक्कल याने झळकावलेले तडाखेबंद नाबाद शतक आणि कर्णधार विराट कोहली याने दिलेली दमदार साथ या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने सलग चौथा विजय मिळवत राजस्थान रॉयल्सचा १० गड्यानी धुव्वा उडवला. यासह आरसीबीने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. देवदत्त पडिक्कलने ५२ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी करत नाबाद १०१ धावा कुटल्या.प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतरही राजस्थानने २० षटकांत ९ बाद १७७ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना देवदत्त-कोहली यांनी राजस्थानला प्रतिकाराची संधीच दिली नाही. दोघांनी १८१ धावांची नाबाद सलामी देत १६.३ षटकांमध्येच संघाचा विजय साकारला. देवदत्त गेल्या सत्राच्या तुलनेत अधिक परिपक्व झाल्याचे दिसून आले. कोहलीनेही जबाबदारी खांद्यावर घेत कर्णधाराची भूमिका योग्यपणे निभावली. त्याने ४७ चेंडूंत नाबाद ७२ धावांचा तडाखा देत ६ चौकार व ३ षटकार मारले. देवदत्तच्या फटकेबाजीपुढे कोहलीलाही प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागली हे विशेष. त्याआधी, आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर शिवम दुबे व रियान पराग यांनी पाचव्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी करत राजस्थानला सुस्थितीत आणले. 

n आंतरराष्ट्रीय सामना न खेळता आयपीएल शतक ठोकणारा देवदत्त, पॉल वल्थाटी व मनीष पांड्ये यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.n आयपीएल शतक ठोकणारा देवदत्त, मनीष पांड्ये व ॠषभ पंत यांच्यानंतरचा तिसरा युवा फलंदाज ठरला.n आयपीएलमध्ये ६ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला.n आरसीबीकडून सर्वाधिक १४ शतके झळकावली गेली. पंजाब किंग्ज (१३) दुसऱ्या स्थानी.n राजस्थानचा दहा गड्यांनी तिसऱ्यांदा पराभव झाला. यापैकी दोनवेळा पराभव आरसीबीविरुद्ध.n आरसीबीने आयपीएलमध्ये दोनशे सामने खेळले. सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये आरसीबी, मुंबई इंडियन्सनंतर (२०७) दुसऱ्या स्थानी.n सर्वाधिक सामने खेळणारा दुसऱ्या क्रमांकावरील कर्णधार गौतम गंभीरच्या १२९ सामन्यांच्या विक्रमाची कोहलीने केली बरोबरी. महेंद्रसिंग धोनी १९२ सामन्यांसह अव्वल स्थानी.

टॅग्स :आयपीएल २०२१