Join us  

इंग्लंडचा संघ १५२ धावांवर ऑल आऊट; देवदत्त पडिक्कलचे शतक, भारतीय संघाकडे आघाडी

India vs England यांच्यात हैदराबाद येथे पहिली कसोटी खेळली जात आहे आणि आर अश्विन व रवींद्र जडेजा या जोडीने इंग्लंडची अवस्था ३ बाद ६० अशी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:20 AM

Open in App

India vs England यांच्यात हैदराबाद येथे पहिली कसोटी खेळली जात आहे आणि आर अश्विन व रवींद्र जडेजा या जोडीने इंग्लंडची अवस्था ३ बाद ६० अशी केली आहे. तेच दुसरीकडे भारत अ संघ इंग्लंड लायन्सचा सामना करतोय आणि त्यांनी सामन्यात पकड घेतली आहे. इंग्लंड लायन्सचा संपूर्ण संघ १५२ धावांवर माघारी पाठवल्यानंतर भारत अ संघाने मोटेरा स्टेडियमवर आघाडी घेतली आहे. देवदत्त पडिक्कलने शतक झळकावले आहे.

प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड लायन्सचा संपूर्ण डाव ५२.४ षटकांत १५२ धावांवर तंबूत परतला. इंग्लंड लायन्सकडून ऑलिव्हर प्राईस ( ४८) व ब्रायडन कार्स ( ३१) हे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. भारत अ संघासाठी आकाश दीपने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. यश दयाल व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २ आणि अर्शदीप सिंग व सौरभ कुमार यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. 

प्रत्युत्तरात कर्णधार अभिमन्यू इश्वरन व देवदत्त पडिक्कल या जोडीने पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. इश्वरन १०८ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५८ धावांवर बाद झाला. तिलक वर्मा ( ६ ) व रिंकू सिंग ( ०) यांना अपयश आले, परंतु देवदत्त एकाबाजून फटकेबाजी करताना दिसला. त्याने १२६ चेंडूंत १७ चौकारांसह १०५ धावा करून भारत अ संघाला आघाडी मिळवून दिली. सर्फराज खान ( ३४) व वॉशिंग्टन सुंदर ( १४ ) हे खेळपट्टीवर फटकेबाजी करत आहेत आणि भारताने ५४ षटकांत ४ बाद २२२ धावा करून ७० धावांची आघाडी घेतली आहे. 

टॅग्स :देवदत्त पडिक्कलभारत विरुद्ध इंग्लंड