Join us

घरच्या मैदानावर नाईट रायडर्सना धूळ चारण्याचा सूपर किंग्जचा निर्धार

अव्वल स्थानावर विराजमान असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये उद्या गुरुवारी त्यांच्याच घरी धूळ चारण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:48 IST

Open in App

कोलकाता : अव्वल स्थानावर विराजमान असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये उद्या गुरुवारी त्यांच्याच घरी धूळ चारण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.धोनी यंदा ‘फूल फॉर्म’मध्ये आहे. याचा प्रत्यय वारंवार आला. गेल्या तीनपैकी दोन डावांमध्ये त्याने अर्धशतके झळकविली. सीएसकेने आठपैकी सहा विजयासह १२ गुणांची कमाई केली. उभय संघ विजय मिळवून येथे दाखल झाले असून परस्परांविरुद्ध खेळणार आहेत. केकेआरने बंगळुरु येथे आरसीबीला १७६ धावांचे लक्ष्य गाठून नमविले तर सीएसकेने पुण्यातील सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभूत केले होते. सीएसकेसाठी धोनीचे प्ररणादायी नेतृत्व आणि धावांचे योगदान अत्यंत उपयुक्त ठरले. माहीने बेंच स्ट्रेंग्थवर विश्वास दाखविताच एन्गिडीने विजयात चमक दाखविली. केरळचा युवा गोलंदाज आसिफ यानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. दुसरीकडे सहा सामने शिल्लक असताना ईडन गार्डनवर केकेआरला पराभव परवडणारा नसेल. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील केकेआरला प्लेआॅफसाठी येथे होणारे सर्व सामने जिंकण्याची गरज असेल. ख्रिस लीन, आंद्रे रसेल आणि सीनील नरेन या विदेशी खेळाडूंच्या बळावर वाटचाल करणारा हा संघ कार्तिक, रॉबिन उथप्पा, शुभमान गिल यांच्या फलंदाजीवर बऱ्याचअंशी विसंबून आहे. सीएसकेवर वर्चस्व गाजवायचे झाल्यास गोलंदाजीतही या संघाला टिच्चूून मारा करावा लागणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स