Join us  

दोन वर्षांची बंदी असूनही शकिब पुढच्या वर्षी खेळू शकतो, काय सांगतात नियम...

मके आयसीसीचे नियम आहेत तरी काय, आपण जाणून घेऊया...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 11:28 AM

Open in App

मुंबई : फिक्सिंगप्रकरणी बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शक्ब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. पण शकिबवर दोन वर्षांची बंदी असली तरी तो पुढच्या वर्षी क्रिकेच खेळू शकतो, असे म्हटले जात आहे. नेमके आयसीसीचे नियम आहेत तरी काय, आपण जाणून घेऊया...

सट्टेबाजाने शकिबशी संपर्क साधला होता. पण ही गोष्ट शकिबने आयसीसीला कळवली नाही. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी आयसीसीने घातली आहे. या दोन वर्षांच्या बंदीमध्ये दोन वेगवेगळ्या शिक्षा आहेत. या बंदीमुळे शकिब भारताच्या दौऱ्यावर येऊ शकणार नाही, ट्वेन्टी-20 विश्वचषकही खेळू शकणार नाही, पण तो पुढच्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात उतरू शकतो, असे म्हटले जात आहे.

आयसीसीने शकिबवर दोन वर्षांची बंदी लादली आहे. यामधील पहिल्या वर्षी त्याच्यावर पूर्ण बंदी लादण्यात आली आहे. या कालावधीमध्ये तो क्रिकेटशी निगडीत कोणतीही गोष्ट करू शकतो. तर दुसऱ्या वर्षासाठी त्याचे निलंबन करण्यात आले आहे. जर शकिबने पहिल्या वर्षभरात आयसीसीला पूर्णपणे सहकार्य केले. त्याने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचे पालन केले आणि नियमितपणे भ्रष्टाचारविरोधी अभ्यासिका आणि पुनर्वसन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला तर तो पुढच्या वर्षी म्हणजेच 29 ऑक्टोबर 2020 या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.

आयीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग?  शकिबचं भारतीय कनेक्शन आलं समोरमुंबई : आयपीएलवर पुन्हा एकदा फिक्सिंगचे काळे ढग जमा झाल्याचे दिसत आहे. कारण बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनवर फिक्सिंगप्रकरणी आयसीसीने दोन वर्षांची बंदी घातली आहे. पण ही फिक्सिंगची गोष्ट आयपीएल सुरु असताना झाल्याचे आता सर्वांसमोर आले आहे. कारण शकिब जेव्हा फिक्सिंग करत होता तेव्हा आयपीएल सुरु होते. त्यामुळे आयपीएल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे.

शकिब हा 2017 आणि 2018 या कालावधीमध्ये एका सट्टेबाजाच्या संपर्कात होता. त्यावेळी शकिब आयपीएल खेळत होता आणि सनरायझर्स हैदराबाद संघात होता. शकिबकडून सट्टेबाजाने संघातील बैठकीमध्ये नेमके काय घडते, याबाबतची माहिती मागवण्याचे समोर आले आहे.

शकिब हा भारताच्या दीपक अगरवाल नावाच्या सट्टेबाताच्या संपर्कात होता. या दोघांमध्ये अनेकदा संभाषण आणि चॅटींग झाल्याचे पुरावे आहेत. शकिबनेही ही गोष्ट मान्य केली असल्यामुळे क्रिकेट जगताबरोबर आयपीएलसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलला बट्टा लागल्याचे चाहते म्हणत आहेत.

बांगलादेशचा कर्णधार आणि आयसीसीच्या जागतिक अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या शकिब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई आयसीसीने केली आहे. त्यामुळे आता भारताच्या दौऱ्याला शकिबला भारताच्या दौऱ्यावर येता येणार नाही. त्यामुळे बांगलादेशच्या निवड समितीने आता नवीन कर्णधाराची नियुक्ती केली आहे.

भारताच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी बांगलादेशच्या खेळाडूंनी बंड केले होते. त्यावेळीच हा दौरा हाणार की नाही. याबाबत साशंकता होती. त्यानंतर आता शकिबवर बंदी घातल्यावर बांगलादेशचा कर्णधार कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न होता. या दौऱ्यातून बांगलादेशचा अनुभवी खेळाडू तमीम इक्बालनेही माघार घेतली होती. पण हा प्रश्न आता बांगलादेशच्या निवड समितीने सोडवला आहे. आता बांगलादेशचे नेतृत्व महमुदुल्लाहकडे सोपवण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी कठोर निर्णय देताना बांगलादेशचा कर्णधार आणि आयसीसीच्या जागतिक अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या शकिब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आह. त्यानं तीन आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले. त्यानंतर आयसीसीनं हा निर्णय घेतला.  त्यामुळे त्याला पुढील मोसमात इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे.

टॅग्स :बांगलादेश