-ललित झांबरे
आयपीएलमध्ये (IPL) अगदी क्वचितच घडते अशी घटना शनिवारी वानखेडे स्टेडीयमवर घडली. महेंद्रसिंग धोनी (Dhoni) शून्यावर बाद झाला. खाते खोलण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सच्या आवेश खान (Avesh Khan) त्याचा त्रिफळा उडवला. आयपीएलच्या आपल्या तब्बल २०५ सामन्यांमध्ये तो केवळ चौथ्यांदाच शून्यावर बाद झाला. एवढ्या सामन्यात सर्वात कमी वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम अजुनही धोनीच्याच नावावर आहे. आयपीएलमध्ये १८० च्यावर सामने खेळलेले जे खेळाडू आहेत त्यात धोनीच सर्वात कमी वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यानंतर रवींद्र जडेजा हा १८५ सामन्यात ६ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
सामन्यांबाबतच नाही तर शून्यावर बाद होऊनही धावांबाबत धोनीच लीडर आहे. आयपीएलमध्ये चार हजारापेक्षा अधिक धावा ज्या फलंदाजांनी केल्या आहेत त्यात धोनी सर्वात कमी म्हणजे फक्त चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ४६३२ धावा आहेत.
आयपीएलमध्ये चार हजारांच्या धावा करणाऱ्या फलंदाजांची शून्यावर बाद होण्याचे प्रमाण असे (शून्य -फलंदाज-धावाया क्रमाने)
४-- महेंद्रसिंग धोनी--४६३२
६-- विराट कोहली-- ५९११
७-- डेव्हिड वॉर्नर --- ५२५४
७-- ख्रीस गेल ------ ४७७२
७-- रॉबिन उथप्पा-- ४६०७
८-- सुरेश रैना ----- ५४२२
९-- एबीडी विलीयर्स- ४८९७
१०- शिखर धवन ---५१९७
१२- गौतम गंभीर --- ४२१७
१३- रोहित शर्मा---- ५२४९