Join us  

Video : बाबो; अखेरच्या षटकात फलंदाजीला आला अन् चौकार, षटकारांची आतषबाजी करून गेला

देवधर चषक वन डे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोरदार फलंदाजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 1:09 PM

Open in App

देवधर चषक वन डे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोरदार फलंदाजी पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना भारत B संघाने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 283 धावा चोपल्या. यशस्वी जयस्वाल, केदार जाधव, विजय शंकर यांनी दमदार खेळी केली, परंतु यात के गौथमची फटकेबाजी भाव खावून गेली. 49व्या षटकाला फलंदाजीला आलेल्या गौथमने तुफान आतषबाजी करताना भारत C संघाच्या गोलंदाजांचा घाम काढला.

प्रथम फलंदाजी करताना भारत B संघाचे सलामीवीर अवघ्या 28 धावांत माघारी परतले. ऋतुराज गायकवाड ( 0) आणि कर्णधार पार्थिव पटेल ( 14) यांना इशार पोरेलने माघारी पाठवले. त्यापाठोपाठ बाबा अपराजितही ( 13) जलाज सक्सेनानं पायचीत झाला. पण, त्यानंतर जयस्वाल आणि केदार यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी 79 धावांची भागीदारी केली. जयस्वालने 79 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 54 धावांची खेळी केली. अक्षर पटेलनं ही जोडी तोडली.

नितीश राणा ( 20) पोरेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. विजय शंकरने केदारला तोलामोलाची साथ दिली. केदारने 94 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 86 धावा केल्या. शंकरने 33 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 45 धावा केल्या. या दोघांनाही पोरेलनं माघारी पाठवले. पोरेलनं 43 धावांत पाच विकेट्स घेतल्या.

पण, 49व्या षटकात आलेल्या गौथमनं दिवेश पठानीयाच्या एका षटकात तुफान फटकेबाजी केली. त्यानं 3 षटकार व 3 चौकार खेचून 10 चेंडूंत नाबाद 35 धावा केल्या. यातील 26 धावा या दिवेशच्या षटकात खेचल्या. 

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :बीसीसीआयकेदार जाधव