Join us  

क्रिकेट संघातील निवडीसाठी ' तो ' करायचा बायकांची मागणी?

इंडियन प्रीमिअर लीगचे अध्यक्ष राजीव शुक्ला हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सहाय्यक मोहम्मद अक्रम सैफीच्या कृत्यामुळे शुक्लांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 2:05 PM

Open in App

नवी दिल्ली - इंडियन प्रीमिअर लीगचे अध्यक्ष राजीव शुक्ला हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सहाय्यक मोहम्मद अक्रम सैफीच्या कृत्यामुळे शुक्लांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट संघात निवड होण्यासाठी सैफी खेळाडूंकडे शरीर सुखासाठी बायकांची मागणी करायचा. एका स्थानिक वृत्तवाहिनीने केलेल्या स्टींग ऑपरेशननंतर हा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. राहुल शर्मा या खेळाडूकडून सैफीने अशी मागणी केली होती. त्याशिवाय सैफी खेळाडूंना बीसीसीआयने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील सहभागाची बनावट प्रमाणपत्रही द्यायचा, असा दावा राहुलने केला आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट बोर्डावर कोणत्याही पदावर नसूनही सैफीचा बोर्डातील कामकाजावर नियंत्रण होते. वृत्तवाहिनीने राहुल आणि सैफी यांच्यातील दूरध्वनीवरील रेकॉर्ड केलेले संभाषण ऐकवले आहे. त्यात सैफीने राहुलला पंचतारांकित हॉटेलमध्ये बाई पाठवण्याची मागणी केल्याचे ऐकू येत आहे. त्याबदल्यात त्याने राहुलला उत्तर प्रदेश संघात खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले होते. सैफने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तो म्हणाला, जर त्या मुलाने माझ्याकडे बाई पाठवल्याचा दावा केला आहे, तर मग तो संघात का नाही. त्यामुळे त्याच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. 

टॅग्स :क्रिकेटक्रीडा