दिल्ली वि. हैदराबाद : संघांच्या दृष्टिकोनावर लढतीचा निकाल

साखळी फेरीत १८ गुणांची कमाई करणाऱ्या संघाला एलिमिनेटरमध्ये १२ गुण मिळवणाºया संघाविरुद्ध खेळावे लागणे अजब वाटते; पण दिल्ली कॅपिटल्स संघ सनरायजर्स हैदराबादविरुद्ध बुधवारी मैदानात उतरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 05:14 AM2019-05-08T05:14:16+5:302019-05-08T05:14:24+5:30

whatsapp join usJoin us
Delhi vs Hyderabad: The result of the team's approach | दिल्ली वि. हैदराबाद : संघांच्या दृष्टिकोनावर लढतीचा निकाल

दिल्ली वि. हैदराबाद : संघांच्या दृष्टिकोनावर लढतीचा निकाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- हर्षा भोगले

साखळी फेरीत १८ गुणांची कमाई करणाऱ्या संघाला एलिमिनेटरमध्ये १२ गुण मिळवणाºया संघाविरुद्ध खेळावे लागणे अजब वाटते; पण दिल्ली कॅपिटल्स संघ सनरायजर्स हैदराबादविरुद्ध बुधवारी मैदानात उतरेल. त्यावेळी त्यांना १४ सामन्यांतील कामगिरीच्या आधारावर आम्ही सरस असल्याचे सिद्ध करावे लागेल. दिल्ली संघ या लढतीत दावेदार म्हणून मैदानात उतरेल.

शिखर धवनला करारबद्ध करण्याचा दिल्लीचा निर्णय लाभदायक ठरला. हेच ईशांत शर्माच्या बाबतीतही म्हणता येईल; पण मजबूत भासत असलेल्या प्रतिस्पर्धी संघात काही कमकुवत बाबी असल्याची हैदराबाद संघाला नक्कीच कल्पना असेल. पृथ्वी शॉ व कोलिन इनग्राम फॉर्मात नाहीत. पंतच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. ख्रिस मॉरिससाठी आयपीएलचा यंदाचा मोसम निराशाजनक ठरला आहे, तर कॅगिसो रबाडा मायदेशी परतला आहे.

दरम्यान, एका बाजूचा विचार करता पंत फॉर्मात असेल, तर तो संघाला सामना जिंकून देतो. श्रेयस आतापर्यंत प्रभावी दिसला. ट्रेंट बोल्ट आतापर्यंत रबाडाचा चांगला पर्याय असल्याचे दिसत आहे. दिल्ली संघालाही डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेयरस्टॉ यांच्या अनुपस्थितीत हैदराबाद संघ तेवढा मजबूत नाही.
सनरायजर्सने लिलावामध्ये समजदारी दाखविताना खेळाडूंची निवड केली. मनीष पांडे व केन विलियम्सन यांना सूर गवसला असून, त्यांच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे. दरम्यान, संघाला मधल्या फळीत आपल्या भारतीय खेळाडूंकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याचसोबत राशीद खानला सूर गवसावा आणि त्याने संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करावे, अशीही संघाला आशा असेल.

पण, सामन्याचा निकाल बºयाच अंशी दृष्टिकोनावर अवलंबून आहे. हैदराबाद संघात तीच ऊर्जा दिसेल. हैदराबाद संघ नशिबाने प्लेआॅफसाठी पात्र ठरला किंवा अन्य संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे आपल्याला संधी मिळाली, ही बाब संघातील खेळाडूंच्या मनात घर करून आहे का? त्याचप्रमाणे वर्चस्व गाजविणाºया दिल्ली संघाच्या मनात अव्वल दोनमध्ये स्थान मिळविता आले नसल्याचे शल्य असेल का?
माझ्या मते, दिल्ली संघ या लढतीत दावेदार म्हणून उतरेल असे वाटते; पण ही एलिमिनेटर लढत असून याची रंगत वेगळीच असते, हे विसरता येणार नाही.

Web Title: Delhi vs Hyderabad: The result of the team's approach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.