- हर्षा भोगले
दिल्ली डेअरडेव्हिल्सने यंदाच्या आयपीएलमध्ये ज्या पद्धतीने डावपेच आखले त्यासाठी संघ दोषी ठरत नाही. काही निराशाजनक मोसमानंतर यंदा दिल्लीने अनेक गोष्टी सुधारल्या. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि शंकर यांच्यासारख्या युवा फलंदाजांना संघात आणले. शिवाय १९ वर्षांखालील संघातील पृथ्वी शॉ तसेच मनजोत कालरा यांची निवड केली. अमित मिश्रा, नदीम आणि तेवतिया यांना फिरकीची, बोल्ट, रबाडा आणि मॉरिस यांना वेगवान माऱ्याची तसेच रॉय, मुन्रो आणि मॅक्सवेल यांना धडाकेबाज फलंदाजीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रिकी पाँटिंगच्या रूपात संघाकडे उत्कृष्ट प्रशिक्षक आहे. आयपीएलच्या जेतेपदासाठी काय करायला हवे, हे पाँटिंगला ठाऊक आहे. याशिवाय गौतम गंभीरच्या रूपात या संघाकडे समर्पित नेतृत्व होते. गंभीरने केकेआरला दोनदा जेतेपद मिळवून दिले आहे. स्थानिक मोसमात
धडाका केल्यानंतर तो आयपीएल खेळत आहे, दोघेही बलाढ्य असून संघासाठी कधी कोणत्या गोष्टी अमलात आणायच्या हे त्यांना चांगलेच अवगत आहे.
यानंतरही यंदाचे सत्र दिल्लीसाठी निराश ठरले. रबाडा आणि मॉरिस जखमांमुळे बाहेर झाले तर गंभीरला मनाप्रमाणे सुरुवात मिळू शकली नाही. लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्याने गंभीर निराश झाला. मॅक्सवेलकडून जी अपेक्षा होती त्यानुसार निकाल दिसलाच नाही.
वाईट निकालानंतर संघात आमूलाग्र बदल करण्याची युक्ती सुचते. पण वेळ निघून गेल्यानंतर त्याचाही लाभ होत नाही. खेळाडूंच्या जखमा ही
समस्या नसती तर दिल्लीचा संघ यंदा बलाढ्य ठरला असता. संघासाठी युवा खेळाडू चांगलीच कामगिरी करीत आहेत पण चाहत्यांना ही बाब समजावून सांगणे सोपे नसते. दिल्ली संघ याच समस्येने ग्रस्त आहे. पण आता नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे. (टीसीएम)