Join us  

Big News : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण?; फ्रँचायझीनं अखेर आज केली घोषणा

Delhi Capitals चा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा पूर्णपणे फिट झाला असून आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 5:49 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वाचे ( IPL 2021 Remaining Matches ) उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE येथे पार पडणार आहेत. त्यासाठी सर्व संघ यूएईत दाखल झाले असून सरावासही सुरुवात केली आहे. Delhi Capitals चा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा पूर्णपणे फिट झाला असून आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला अन् त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आणि नेतृत्वाची जबाबदारी रिषभच्या खांद्यावर सोपवली गेली. पण, आता श्रेयस परतला आहे आणि  रिषभ पंतकडे ( Rishabh Pant) कर्णधारपद कायम राहिल की नाही, यावर चर्चा सुरू होती. दिल्ली कॅपिटल्सनं याबाबत गुरुवारी मोठी घोषणा केली. 

श्रेयसच्या गैरहजेरीत दिल्ली कॅपिटल्सनं कर्णधारपदाची जबाबदारी रिषभकडे सोपवली होती. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीनं ८ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे श्रेयसच्या कमबॅक नंतरही आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यात DC च्या नेतृत्वाची धुरा ही रिषभ पंतकडेच असणार आहे, असे आज फ्रँचायझीनं जाहीर केलं. 

दिल्ली कॅपिटल्सचे वेळापत्रक22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून28 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि, चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून8 ऑक्टोबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून 

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सरिषभ पंत
Open in App