Join us  

"काय होतंय त्याची पर्वा करू नका...", दुसऱ्या सामन्यातही फ्लॉप ठरल्यानंतर पृथ्वी शॉची पोस्ट चर्चेत

prithvi shaw ipl : सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 1:14 PM

Open in App

prithvi shaw ipl dc । मुंबई : सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2023) १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे. नियमित कर्णधार रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचा संघ डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात आयपीएलच्या रनसंग्रामात उतरला आहे. मात्र, आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात कॅपिटल्सला पराभव स्वीकारावा लागला. दोन्हीही सामन्यात दिल्लीच्या आघाडीच्या फलंदाजांना साजेशी खेळी करता आली नाही. १६व्या पर्वातील तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झाला. लोकेश राहुलच्या नेतृत्वातील लखनौने ५० धावांनी विजय मिळवत दिल्लीला पराभवाचा धक्का दिला. तर काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्लीचा दारूण पराभव केला.

दरम्यान, सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्लीच्या सलामीवीरांना अडचणींचा सामना करावा लागला. वॉर्नर आणि पृथ्वी या जोडीच्या अपयशाचा फटका संघाला बसत आहे. भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉला पहिल्या दोन सामन्यात २० धावांचा देखील आकडा गाठता आला नाही. लखनौविरूद्ध तो ९ चेंडूत १२ धावा करून तंबूत परतला तर काल ५ चेंडूत ७ धावा करून मोहम्मद शमीचा शिकार झाला. अशातच सततच्या अपयशानंतर पृथ्वीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. 

दिल्लीचा सलग दुसरा पराभव पृथ्वी शॉने इंस्टाग्राम एक स्टोरी ठेवून म्हटले, "थांबू नका, स्वत:वर विश्वास ठेवा. जे काही होतंय त्याची अजिबात पर्वा करू नका." काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १६२ धावा केल्या. दिल्लीने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने साजेशी सुरूवात केली. साई दर्शनने केलेल्या ४८ चेंडूत ६२ खेळीच्या जोरावर हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने सलग दुसरा विजय मिळवला. गुजरातच्या संघाने १८.१ षटकांत ४ बाद १६३ धावा करून सामना आपल्या नावावर केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३दिल्ली कॅपिटल्सपृथ्वी शॉगुजरात टायटन्स
Open in App