Join us  

रिषभ पंतला मिळाला स्फोटक साथीदार; DC च्या ताफ्यात २९ चेंडूंत शतक ठोकणारा शिलेदार

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) ताफ्यात परतल्याने चाहते आनंदित झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:35 AM

Open in App

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) ताफ्यात परतल्याने चाहते आनंदित झाले आहेत. रिषभने नेटमध्ये जोरदार फटकेबाजी केली. आता रिषभसारखीच आक्रमक फटकेबाजी करणारा २१ वर्षीय ऑस्ट्रेलियन शिलेदार दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. जॅक फ्रेझर-मॅकगर्क हा DC कडून आयपीएल २०२४ मध्ये खेळणार आहे आणि लुंगी एनगिडीच्या जागी त्याची निवड केली गेली आहे. दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगच्या प्ले ऑफमध्ये एनगिडीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती आणि आता तो आयपीएल २०२४ लाही मुकणार आहे. 

"एनगीडीवर सध्या क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) वैद्यकीय संघाचे निरीक्षण केले जात आहे आणि त्याचा स्थानिक संघ मोमेंटम मल्टीप्लाय टायटन्ससह पुनर्वसन केले जात आहे. तो एप्रिलमध्ये चालू असलेल्या CSA T20 चॅलेंजच्या दुसऱ्या टप्प्यात खेळण्यासाठी परतण्याची अपेक्षा आहे," असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ( CSA)  एका निवेदनात म्हटले आहे.

फ्रेझर-मॅकगर्क यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ( २९ चेंडू) सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला आणि गेल्या वर्षी दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना एबी डीव्हिलियर्सचा ( ३१ चेंडूत शतकाचा ) विक्रम मोडला. त्याने बिग बॅश लीगमध्ये १५८.६४ च्या स्ट्राईक रेटने ८ सामन्यांत २५७ धावा केल्या. त्याला ५० लाखांच्या किमतीत DC ने ताफ्यात घेतले. एनगिडीने १४ सामन्यांत २५ विकेट्स घेतल्या होत्या. 

या करारामुळे दिल्ली कॅम्पमध्ये थोडी उलथापालथ झाली आहे. अलीकडेच कौटुंबिक कारणांमुळे हॅरी ब्रूकने माघार घेतली होती. एनरिच नॉर्टजेच्या उपलब्धतेवर घाम गाळत आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२४रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्स