Join us  

"Dear Virat...", विराट कोहलीच्या चिमुरडीला अत्याचाराची धमकी; राहुल गांधी भारतीय कर्णधाराला म्हणाले...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावर सध्या सडकून टीका होत आहे. ही टीका करताना काही विकृत चाहत्यांनी पातळी सोडून बोलायला सुरुवात केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 6:02 PM

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावर सध्या सडकून टीका होत आहे. ही टीका करताना काही विकृत चाहत्यांनी पातळी सोडून बोलायला सुरुवात केली आहे आणि अशाच काही उपद्रवी लोकांनी आता विराट कोहलीसोबतच ( Virat Kohli) त्याच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य केले आहे. विराट आणि अनुष्काच्या १० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकीच दिली गेली. दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या प्रमुख स्‍वाती मालीवाल यांनी दिल्‍ली पोलीसच्या सायबर क्राइम ब्रांचला पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.  काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधीदेखील (Rahul Gandhi) यांनीही विराटसाठी खास ट्विट केलं असून त्यानं भारतीय कर्णधाराला सल्ला दिला आहे. 

पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही मोहम्मद शमीवर अनेकांनी अत्यंत हीन दर्जाची टीका केली होती. यावेळी तर विराटच्या कुटुंबीयांवर टीका करताना लोकांनी नीचपणाचा कळसच गाठला आहे. याआधीही भारतीय संघ पराभूत झाला की, अनुष्का शर्माला ट्रोल केले जायचे. यावेळी तर विराट आणि अनुष्काच्या १० महिन्यांच्या वामिकाला लक्ष्य करण्यात आले आहे. कोहली कुटुंबीयांवर करण्यात आलेल्या या टीकेचा पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमान उल् हकने खरपूस समाचार घेतला आहे. “विराटच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेली टीका ऐकून खूप वेदना झाली. कोहलीच्या नेतृत्वावर आणि फलंदाजीवर तुम्ही टीका करू शकता. पण त्याच्या कुटुंबीयांवर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असे इंझमाम म्हणाला. 

राहुल गांधी यांनी ट्विट केलं की,''प्रिय विराट, या लोकांमध्ये प्रचंड द्वेष भरला गेला आहे कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना क्षमा करा. संघाचे रक्षण करा.''

आम्ही सर्व तुझ्यासोबत, मोहम्मद शमीच्या ट्रोलर्संना राहुल गांधांनी चांगलंच सुनावलंयाआधी मोहम्मद शमीवर टीका करणाऱ्यांनाही राहुल गांधी यांनी सुनावलं होतं. ‘मोहम्मद शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. लोकांची मने घृणेने भरलेली असतात कारण त्यांना कोणी प्रेम दिलेलंच नसतं. त्यांना माफ करुन टाक.’, असे ट्विट राहुल गांधींनी केल होतं. 

टॅग्स :विराट कोहलीराहुल गांधीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App