Join us  

DD v/s RCB- कॅप्टन कोहलीची तब्येत बिघडली, सामन्यातून आराम मिळण्याची शक्यता

आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीला आराम मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 4:16 PM

Open in App

नवी दिल्ली- दिल्ली डेअरडेव्हिल्स विरूद्ध रॉयल चॅलेन्जर्स बँगलोर हे दोन संघ आज दिल्लीतील फिरोज शहा कोटला मैदानावर आमने-सामने येणार आहेत. दिल्ली डेअरडेविल्स हा संघ आठ संघाच्या यादीमध्ये शेवटच्या स्थानी आहे. तर आरसीबी संघ 10 पैकी तीन सामने जिंकत सातव्या स्थानी आहे. आरसीबीला अजून चार सामने खेळायचे आहेत. या चार सामन्यात विजय मिळविल्यास आरसीबी प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता आहे. प्लेऑफमध्ये पुन्हा येण्यासाठी आरसीबीला सर्व चारही सामने जिंकावेच लागणार आहेत. पण आजच्या सामन्यात आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीला आराम मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीची तब्येत बिघडल्याचं समजतं आहे. तब्येत बिघडल्याने विराट सरावासाठीही उपस्थित नव्हता. त्यामुळे विराटऐवजी आता ए.बी डिव्हीलिअर्सला कॅप्टन्सी सांभाळावी लागणार असल्याची शक्यता वर्तविली जाते आहे. विराट आजारी असल्याची चर्चा असून टीमकडून अधिकृतपणे याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, सलग सहाव्या वर्षी ‘प्ले ऑफ’मधून बाहेर झालेल्या या संघाला आयपीएलमध्ये आज शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे आव्हान आहे. अंतिम स्थानावर राहण्याची नामुष्की टाळण्यासाठी आरसीबीला पराभूत करावेच लागणार आहे. डेअरडेव्हिल्स गेली पाच वर्षे प्ले ऑफपासून वंचित आहे. यंदा रिकी पाँटिंग या संघाचा कोच बनला. केकेआरला दोनदा जेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरकडे नेतृत्व सोपविले. नव्या लिलावात संपूर्ण संघ बदलला. पण निकाल मात्र शून्यच. तरीही सहाव्या वर्षी संघाची घसरण सुरूच आहे.

फलंदाजी आणि गोलंदाजीत हा संघ ढेपाळला. क्षेत्ररक्षणातही अक्षम्य चुका केल्या. ११ सामन्यात केवळ तीन विजयांसह हा संघ स्पर्धा संपायला वेळ असताना बाहेर पडला आहे.

टॅग्स :आयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविराट कोहली