Join us  

DC vs SRH Latest News : केन विलियम्सन आला अन् फटकेबाजी केली; SRHनं उभारला समाधानकारक पल्ला

DC vs SRH Latest News  : सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघ Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad )  विरुद्धच्या लढतीत विजयी लय कायम राखण्यास उत्सुक आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: September 29, 2020 9:22 PM

Open in App

DC vs SRH Latest News  : सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघ Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad )  विरुद्धच्या लढतीत विजयी लय कायम राखण्यास उत्सुक आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) नेतृत्वाखालील SRH संघ स्पर्धेत विजयाची चव न चाखलेला एकमेव संघ आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजयासाठी वॉर्नर अँड टीमकडून सर्वतोपरी प्रयत्न झालेले पाहायला मिळाले. सावध सुरुवातीनंतर SRHने समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि केन विलियम्सन ( Kane Williamson ) यांनी दमदार खेळ केला. 

दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) SRHविरुद्ध आक्रमक रणनीती वापरली. डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) हे स्फोटक फलंदाज समोर असताना DCनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये चार गोलंदाजांचा वापर केला. त्यात उत्तम क्षेत्ररक्षण लावून DCनं त्यांना मोठे फटके मारण्यापासूनही रोखलं. SRHला पहिल्या 6 षटकांत 38 धावा करता आल्या, त्यापैकी 14 धावा सहाव्या षटकात आल्या. त्यानंतर SRHच्या फलंदाजांनी गिअर बदलला आणि 8च्या सरासरीनं धावा करण्यास सुरुवात केली. 10व्या षटकात अमित मिश्रानं ( Amit Mishra) DCला पहिले यश मिळवून दिले. त्यानं वॉर्नरला बाद केले. पंचांनी नाबाद दिल्यानंतर DCनं DRS घेतला आणि त्यात वॉर्नर बाद असल्याचे स्पष्ट झाले. वॉर्नरने 33 चेंडूंत 3 चौकार 2 षटकारांसह 45 धावा केल्या. 

मिश्रानं पुढच्या षटकात मनीष पांडेला ( 3) बाद केले. DCच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना SRHच्या धावगतीला लगाम लावून ठेवला होता. SRHचे चाहते ज्याची वाट पाहत होते, तो केन विलियम्सन ( Kane Williamson) याचे अखेर IPL 2020त पदार्पण झाले. केननं त्याच्या क्लासिक फटक्यांनी चाहत्यांना खुशही केले. SRHनं 15 षटकांत 2 बाद 115 धावा केल्या होत्या. त्याची फटकेबाजी पाहून चाहत्यांना आनंद झाला. बेअरस्टोनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, पुढच्याच चेंडूंवर कागिसो रबाडानं ( Kagiso Rabada) त्याला बाद केलं. बेअरस्टो 48 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 53 धावा करून माघारी परतला. केननंही 26 चेंडूंत 5 चौकारांसह 41 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) 20 षटकांत 4 बाद 162 धावा केल्या. 

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्स