Join us  

DC vs KKR Latest News : अजिंक्य रहाणे सलामीला येणार; मैदानावर उतरताच मोठा विक्रम नोंदवला

DC vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 24, 2020 3:24 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. DCला आपले अव्वल स्थान कायम राखायचे असले तर त्यांना KKRविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत चांगली कामगिरी करावी लागेल. DCतर्फे शिखर धवन शानदार फॉर्मात आहे. त्याने गेल्या दोन्ही सामन्यांत शतके झळकावली, पण किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध फलंदाज अपयशी ठरल्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉ याला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी संघात अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली आहे. अजिंक्यनं मैदानावर उतरताच एका विक्रमाला गवसणी घातली. आजच्या सामन्यात रहाणे सलामीला येणार आहे. 

Delhi Capitals XI: अजिंक्य रहाणे, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, ए नॉर्ट्झे, आर अश्विन, कागिसो रबाडा, तुषार देशपांडे

Kolkata Knight Riders XI: शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, नितिश राणा, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, सुनील नरिन, पॅट कमिन्स, ल्युकी फर्गुसन, के नागरकोटी, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्थी 

अजिंक्य रहाणेचा हा २०० वा ट्वेंटी-20 सामना आहे. रहाणेनं १९९ ट्वेंटी-20 सामन्यांत ५०१३ धावा केल्या आहेत. त्यात २ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत.

टॅग्स :IPL 2020अजिंक्य रहाणेदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स