Join us  

DC vs KKR Latest News : वीरूला जे नाही जमलं ते रिषभ पंतनं करून दाखवलं; IPLमध्ये कमी चेंडूंत 'अनोखं' शतक झळकावलं!

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 24, 2020 6:12 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. करो वा मरो सामन्यात KKRची सुरुवात निराशाजनक झाली. आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर नितिश राणा आणि सुनील नरीन यांनी विक्रमी भागीदारी करताना संघाला मोठा पल्ला गाठून दिला. DCची सुरुवात निराशाजनक झाली. पण, रिषभ पंत व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. पंतनं या सामन्यात एका विक्रमाला गवसणी घातली. वीरेंद्र सेहवागलाही हा विक्रम करता आला नाही. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या KKR ला साजेशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल ( ९), राहुल त्रिपाठी ( १३) आणि दिनेश कार्तिक ( ३) यांना अपयश आले. नितिश राणा व संघात पुनरागमन करणाऱ्या सुनील राणा यांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. १७व्या षटकात कागिसो रबाडानं ही भागीदारी संपुष्टात आणली. नरीन ३२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकार खेचून ६४ धावांवर माघारी परतला. नरीननं आजच्या सामन्यात IPLमधील ५० षटकार व १०० चौकारांचा पल्लाही ओलांडला. राणानं ५३ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारासह ८१ धावा चोपल्या. KKRनं २० षटकांत ६ बाद १९४ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणे (०) पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. सलग दोन सामन्यांत शतक झळकावून इतिहास घडवणाऱ्या शिखर धवनची बॅट आज थंड पडली. कमिन्सनं तिसऱ्या षटकात त्याचा ( ६) त्रिफळा उडवला. रिषभ पंत व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. पंतनं खणखणीत षटकार खेचून विक्रमाला गवसणी घातली. दिल्ली कॅपिटल्सकडून १०० षटकार मारणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. शिवाय आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंचा ( १२२४ चेंडू) सामना करून १०० षटकार खेचण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रमही त्यानं नावावर केला. यापूर्वी युसूफ पठाणनं १३०८ चेंडूंचा सामना करून षटकाराचे शतक साजरे केले होते.

पाहा व्हिडीओ...

दिल्ली कडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज - रिषभ पंत ( १००), वीरेंद्र सेहवाग ( ८५), श्रेयस अय्यर ( ८०),  डेव्हिड वॉर्नर ( ५८), जेपी ड्यूमिनी ( ४३). 

एकाच संघाकडून षटकाराचे शतक साजरे करणारे फलंदाज दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( १००*)चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी ( १८६), सुरेश रैना ( १७१) मुंबई इंडियन्स - किरॉन पोलार्ड ( १९३), रोहित शर्मा ( १५८)राजस्थान रॉयल्स - ( १०९)कोलकाना नाईट रायडर्स - ( १२३)  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ख्रिस गेल ( २३९), एबी डिव्हिलियर्स ( २१८), विराट कोहली ( १९९)  सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर ( १३१) 

टॅग्स :IPL 2020रिषभ पंतविरेंद्र सेहवागदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स