Join us  

आजचा दिवस सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मासाठी खास, जुळून आला असाही योगायोग

आज या दोघांबाबतचा एक योगायोग आज जुळून आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:32 AM

Open in App

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा हे दोघेही सलामीवीर. हे दोघेही मुंबईचेच. पण आज या दोघांबाबतचा एक योगायोग आज जुळून आला आहे.

सचिनला आदर्श मानत रोहितने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. सचिनकडे सुरुवातीला मुंबई इंडियन्सचे नेतृत्व होते. त्यानंतर ही कमान रोहितकडे सोपवण्यात आली. रोहितने मुंबई इंडियन्सला जेतेपदही जिंकवून दिले. पण त्या व्यतिरीक्त या दोघांमध्ये एक योगायोग आज जुळून आला आहे.

आजचा दिवस १४ नोव्हेंबर. भारत आणि बांगलादेश यांच्यामधील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. रोहित शर्माही भारताच्या संघात आहे. रोहितचा हा एकूण ३५०वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. आजच्या दिवशी रोहित आपला ३५०वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून सचिनने आपला २००वा कसोटी सामनाही याच दिवशी खेळला होता.

रोहितने आतापर्यंत २१८ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याचबरोबर १०१ ट्वेन्टी-२० सामने तो भारताकडून खेळला आहे. सध्या ३१ वा कसोटी सामना खेळायला रोहित मैदानात उतरला आहे. त्यामुळे त्याचा हा ३५०वा आंतरराष्ट्रीय सामना आहे.

सचिनच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्याला आजपासून सुरुवात झाली. आजच्या दिवशी वानखेडेवर वेस्ट इंडिजविरुद्ध सचिनचा २००वा कसोटी सामना सुरु झाला होता. त्यामुळे सचिनसाठीही ही गोष्टी महत्वाची होती.

टॅग्स :सचिन तेंडुलकररोहित शर्मा