Join us

कार्तिकच्या नेतृत्वाला डेअरडेव्हिल्सचे आव्हान

दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्ससमोर सोमवारी गौतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असणार आहे. गंभीरने आपल्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:31 IST

Open in App

कोलकात्ता -  दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्ससमोर सोमवारी गौतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असणार आहे. गंभीरने आपल्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते.सलग दोन वेळा पराभव झाल्यामुळे केकेआरला या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दिल्लीने मुंबईला पराभूत केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.कोलकाताने बंगळूरला पराभूत करून या सत्राची सुरुवात केली होती. मात्र चेन्नई व हैदराबाद यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे दिल्लीला पहिल्याच सामन्यात पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. राजस्थानविरुद्धही पावसामुळे त्यांना गुण गमवावे लागले. त्यानंतर त्यांनी बलाढ्य मुंबईला पराभूत केले. मैदानावर दिल्लीचा संघ तुलनेने प्रबळ वाटत आहे. केकेआरच्या फलंदाजांना अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. उथप्पाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याने आतापर्यंत १३, २९ व तीन धावा केल्या आहेत.

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सक्रिकेटआयपीएल लिलाव 2018