CWG 2022: India vs Barbados : भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश, बार्बाडोसवर १०० धावांनी मिळवला विजय 

CWG 2022: India vs Barbados : भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 01:42 AM2022-08-04T01:42:31+5:302022-08-04T01:42:48+5:30

whatsapp join usJoin us
CWG 2022: India vs Barbados : India Women qualified into the Semi-final, beat Barbados by 100 runs | CWG 2022: India vs Barbados : भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश, बार्बाडोसवर १०० धावांनी मिळवला विजय 

CWG 2022: India vs Barbados : भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश, बार्बाडोसवर १०० धावांनी मिळवला विजय 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CWG 2022: India vs Barbados : जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा व शेफाली वर्मा यांच्या फटकेबाजीनंतर रेणुका सिंग ठाकूरने केलेल्या कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. साखळी गटातील अखेरच्या सामन्यात भारतीय महिलांनी सांघिक खेळ करताना बार्बाडोसचा सहज पराभव केला. अ गटातून ऑस्ट्रेलिया व भारत यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.

बार्बाडोसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना व शेफाली वर्मा यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. स्मृतीने एक धाव घेताच रोहितच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, ५ धावांवर ती LBW होऊन माघारी परतली. भारताकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून २०००+ धावा करणारी स्मृती दुसरी खेळाडू ठरली. रोहितने सलामीवीर म्हणून  २९७३ धावा केल्या आहेत, तर स्मृतीने आज २००४ धावांचा टप्पा गाठला. शिखर धवन १७५९, मिताली राज १४०७ व लोकेश राहुल १३९२ असा पुढील क्रमांक आहे. स्मृती बाद झाल्यानंतर शेफाली व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी ७१ धावांची भागीदारी केली. शेफाली २६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४३ धावांवर रन आऊट झाली. 


कर्णधार हरमनप्रीत कौरही ( ३) लगेच माघारी परतली अन् भारताने ९.३ षटकांत ७८ धावांत ३ विकेट्स गमावल्या. जेमिमा रॉड्रीक्स व दीप्ती शर्मा यांनी भारताच्या डावाला आकार देताना बार्बाडोसच्या गोलंदाजांची धुलाई केली. जेमिमाने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तिचे हे सातवे अर्धशतक ठरले. जेमिमा ४६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६ धावांवर नाबाद राहिली. दीप्तीनेही २८ चेंडूंत नाबाद ३४ धावा करताना जेमिमासह ६६ धावा जोडल्या. भारताने ४ बाद १६२ धावा केल्या. 


प्रत्युत्तरात रेणुका सिंगने तिच्या ४ षटकांत १० धावा देताना ४ विकेट्स घेऊन बार्बाडोसची अवस्था ४ बाद १९ अशी केविलवाणी केली. त्यात मेघना सिंग व स्नेह राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेऊन बार्बाडोसला ६ बाद ४५ असे बॅकफूटवर फेकले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रेणुका सिंगने आतापर्यंत सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या  आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने १८ धावांत ४ , तर पाकिस्तानविरुद्ध २० धावांत १ विकेट घेतली होती. बार्बाडोसला ८ बाद ६८ धावाच करता आल्या. 

Web Title: CWG 2022: India vs Barbados : India Women qualified into the Semi-final, beat Barbados by 100 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.