Join us  

हार्दिक पांड्याकडून ५ कोटींची २ घड्याळं जप्त; टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर अडचणीत वाढ

हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत रविवारी मायदेशी परतला तेव्हा कस्टम विभागाने त्याला रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 10:16 PM

Open in App

नवी दिल्ली - टी-२० वर्ल्डकप २०२१ च्या स्पर्धेत खराब कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू हार्दिक पांड्याला(Hardik Pandya) टीम इंडियातून विश्रांती दिली आहे. आता हार्दिक पांड्या नव्या अडचणीत सापडला आहे. हार्दिक पांड्याकडून ५ कोटी किंमतीची २ घड्याळ जप्त करण्यात आली आहे. एअरपोर्ट प्राधिकरणाच्या कस्टम विभागाने हार्दिक पांड्यावर ही कारवाई केली आहे. त्यामुळे पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हार्दिक पांड्या याच्याकडे ५ कोटींच्या या घड्याळांचे बिल नव्हते आणि त्याबाबत पांड्याने काहीही डिक्लेयर केले नव्हते. हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत रविवारी मायदेशी परतला तेव्हा कस्टम विभागाने त्याला रोखले आणि त्याच्याकडून महागडी घड्याळं जप्त करण्यात आली. हार्दिक पांड्याला महागड्या घड्याळांची हौस आहे. आयपीएल २०२१ दरम्यान या खेळाडूने Phillippe Nautilus Platinum 5711 घड्याळ घातलं होतं. ज्याची किंमत ५ कोटीपेक्षा अधिक आहे. हे महागडं घड्याळ जगातील खूप कमी लोकं परिधान करतात.

२०१९ मध्येही हार्दिक पांड्याने एक फोटो शेअर केला होता ज्यात तो हॉस्पिटलमध्ये बेडवर उपचार घेत होता आणि त्याच्या हातात सोन्याचं घड्याळ होतं. मागील वर्षी हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ कुणाल हादेखील महागडं घड्याळ घातलं होतं म्हणून अडचणीत आला होता. त्यानेही लाखो रुपयांच्या व्यवहाराबाबत कस्टम विभागाला माहिती दिली नव्हती. त्यानंतर कस्टमने ते महागडं सामान जप्त केले.

हार्दिकला संघात परतण्यासाठीही करावी लागणार मेहनत

हार्दिक पांड्याला टीम इंडियातून वगळले गेले. त्यामुळे आता पुन्हा संघ निवडीसाठी दावा सांगायचा असेल, तर त्याला स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल.  हार्दिकचा फक्त फलंदाज म्हणून आम्ही संघात समावेश करू शकत नाही. त्याला स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल. त्याला टीम इंडियात कमबॅक करायचं असेल, तर स्वतःचा फॉर्म व तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल, ''असे निवड समितीच्या सदस्यानं inside.sports ला सांगितले आहे. त्यामुळे टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर आता मायदेशी परतताच त्याच्या अडचणीत आणखी वाढ होताना पाहायला मिळत आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्या
Open in App