CSK vs SRH Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील Play Off च्या शर्यतीत कायम राखण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सवर ( Chennai Super Kings) 'करा किंवा मरा' हे संकट कायम आहेच. सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या परतीच्या सामन्यात MS Dhoniनं आक्रमक रणनीती आखताना सॅम कुरनला सलामीला पाठवले. त्याचा हा डाव काहीअंशी यशस्वी ठरला अन् CSKनं समाधानकारक पल्ला गाठला. शेन वॉटसन, धोनी, अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांनी मोठे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या SRHला पहिल्या १० षटकांत तीन धक्के बसले. ड्वेन ब्राव्होनं ०२.९२ सेकंदात मनीष पांडेला धावबाद करून माघारी पाठवले.
फॅफ ड्यू प्लेसिस आणि कुरन यांनी CSKच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप शर्मानं CSKला ड्यू प्लेसिसच्या (०) रुपानं पहिला धक्का दिला. कुरननं फटकेबाजी केली. संदीप शर्मानं त्याचा अडथळा दूर केला. कुरन २१ चेंडूंत ३१ धावांवर माघारी परतला. शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी तिसऱ्या विकेटसाठई ८१ धावांची भागीदारी केली. खलील अहमदनं SRHला यश मिळवून देताना रायुडूला ( ४१) बाद केले. पुढच्याच षटकात टी नटराजननं CSKला आणखी एक धक्का दिला. वॉटसन ३८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा करून माघारी परतला. धोनी १३ चेडूंत २१ धावा करून माघारी परतला. रवींद्र जडेजानं १० चेंडूंत २५ धावा करताना चेन्नईला ६ बाद १६७ धावांचा पल्ला गाठून दिला. (
महेंद्रसिंग धोनीला बाद करण्यासाठी संदीप शर्मानं घेतली सुपर डाईव्ह, पण...; पाहा व्हिडीओ)
लक्ष्याचा पाठलाग करताना SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( ९) व मनीष पांडे ( ४) फारवेळ खेळपट्टीवर टीकले नाही. सॅम कुरननं वॉर्नरचा अडथळा दूर केला, तर ड्वेन ब्राव्होनं अचूक नेम धरताना पांडेला धावबाद केले. जॉनी बेअरस्टो व केन विलियम्सन यांनी हैदराबादचा डाव सावरला, परंतु रवींद्र जडेजानं SRHला धक्का दिला. बेअरस्टो २३ धावांवर त्रिफळाचीत झाला. केन आज चांगल्या फॉर्मात होता आणि त्यानं चेन्नईच्या गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. आक्रमकतेपेक्षा त्याच्या फटक्यांमधल्या अचूक टायमिंगनं धोनीला हैराण केलं. ( ऐकीच मारा लेकिन सॉलिड मारा!;महेंद्रसिंग धोनीचा Six पाहून हेच म्हणाल, Video)
ड्वेन ब्राव्होनं केलेला Run Out पाहा...