CSK vs RCB Latest News : विराट कोहली ठरला जगात लय भारी; ट्वेंटी-20 त नोंदवला कुणालाच न जमलेला विक्रम

Indian Premier League ( IPL 2020) आजच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings)नं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या सामन्यात केदार जाधवला ( Kedar Jadhav) संघाबाहेर बसवलं.

By स्वदेश घाणेकर | Published: October 10, 2020 08:51 PM2020-10-10T20:51:18+5:302020-10-10T20:51:56+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs RCB Latest News : Virat Kohli becomes first cricketer to score 6000 runs for a same team in T20 history | CSK vs RCB Latest News : विराट कोहली ठरला जगात लय भारी; ट्वेंटी-20 त नोंदवला कुणालाच न जमलेला विक्रम

CSK vs RCB Latest News : विराट कोहली ठरला जगात लय भारी; ट्वेंटी-20 त नोंदवला कुणालाच न जमलेला विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) आजच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings)नं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या सामन्यात केदार जाधवला ( Kedar Jadhav) संघाबाहेर बसवलं.  RCBचा कर्णधार विराट कोहली यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरोन फिंच हा माघारी परतल्यानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) देवदत्त पडीक्कलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पण, शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) एकाच षटकात RCBला दोन धक्के दिले. पडीक्कल ( 33) पाठोपाठ एबी डिव्हिलियर्सलाही त्यानं शून्यावर माघारी पाठवले. पण, कोहली दुसऱ्या बाजूनं खिंड लढवत होता आणि त्यानं यासह विक्रमी कामगिरी केली.  CSK vs RCB Latest News 

Royal Challengers Bangalore XI: देवदत्त पडीक्कल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकिरत सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, इसुरू उडाना, ख्रिस मॉरिस, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल.

Changes for RCB:
IN: ख्रिस मॉरिस, गुरकिरत सिंग 
OUT: मोईन अली, मोहम्मद सिराज

Chennai Super Kings XI: शेन वॉटसन, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, सॅण कुरन, एऩ जगदीसन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर, दीपक चहर

Changes for CSK:
IN: एन जगदीसन
OUT: केदार जाधव

विराटनं आजच्या सामन्यात मोठा पराक्रम केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून 6000 धावा करणारा तो जगातला पहिलाच खेळाडू ठरला.

एकाच संघाकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली ( RCB) - 6003*
सुरेश रैना ( CSK) - 5369
ल्युक राईट ( Sussex) - 4517
महेंद्रसिंग धोनी ( CSK )- 4409
रोहित शर्मा ( MI ) - 4212

Web Title: CSK vs RCB Latest News : Virat Kohli becomes first cricketer to score 6000 runs for a same team in T20 history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.