Indian Premier League ( IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगत आहे. गुणतक्त्यात ( Point Table) KKR व CSK प्रत्येकी 4 गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे. CSKची कामगिरी समाधानकारक झाली नसली तर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी एकहाती सामना जिंकला. त्यामुळे CSKचे मनोबल उंचावले आहे. दुसरीकडे KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक याला संघाची घडी नीट बसवता येत नाही. इयॉन मॉर्गनच्या फलंदाजी क्रमवारीवरून त्याच्यावर टीका होत आहे, शिवाय सुनील नरीनचा फॉर्म हा संघासाठी चिंतेची बाब बनली आहे.
कार्तिकनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाइट रायडर्सनं यापूर्वी मे २०१५ मध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच ६९ सामन्यांनंतर KKRनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( २०१५) कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि कोलकातानं तो सामना १५ धावांनी जिंकला. या सामन्यात पीयूष चावला ( ४/३२) मॅन ऑफ दी मॅच ठरला होता.
Kolkata Knight Riders Team - शुबमन गिल, सुनील नरीन, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम माली, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्थी
Chennai Super Kings Team - शेन वॉटसन, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, कर्ण शर्मा