Join us  

CSK vs DC Latest News : शिखर धवनची 'गब्बर' खेळी; आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक 

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर होताना दिसत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 17, 2020 11:04 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर होताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) आजच्या सामन्यात जवळपास चेन्नईला पराभवाच्या छायेत टाकले आहे. शिखर धवननं एकहाती फटकेबाजी करताना शतकी खेळी केली. १३ वर्ष, १६८ सामने अन् ४९००+ धावांनंतर शिखर धवननं ट्वेंटी-20 तील पहिलं शतक झळकावलं. या प्रवासात त्यानं 39 वेळा अर्धशतकी खेळी केली. 

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) गोलंदाज तुषार देशपांडे यानं पहिल्याच चेंडूंवर CSKला धक्का दिला. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी CSKला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. नॉर्ट्झेनं ३६ धावा करणाऱ्या वॉटसनला बाद केले. कागिसो रबाडानं  १५ व्या षटकात फॅफला बाद केले. फॅफनं ४७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. त्यानंतर आलेला धोनी ( ३) धावांवर माघारी परतला, परंतु रायुडू व जडेजा यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेताना पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रायुडू २५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४५, तर जडेजा १३ चेंडूंत ४ षटकारांसह ३३ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईनं ४ बाद १७९ धावा केल्या. अॅनरिच नॉर्ट्झेनं दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात DCची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ पहिल्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अजिंक्य रहाणे ( ८) पुन्हा एकदा अपयशी ठरला, चहरनं त्यालाही माघारी पाठवले. शिखर धवनचे सोडलेले दोन झेल चेन्नई सुपर किंग्सला महागात पडले. शिखर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली. ड्वेन ब्राव्होनं ही ६८ धावांची भागीदारी अय्यरला ( २३) बाद करुन संपुष्टात आणली. पण, धवन एका बाजूनं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत होता. मार्कस स्टॉयनिसनं वाहत्या गंगेत हात धुतले. नशीबानंही धवनला साथ दिली. त्याचे तीन झेल चेन्नईच्या क्षेत्ररक्षकाकडून सुटले. स्टॉयनिस २४ धावांवर माघारी परतला. अॅलेक्स कैरीही ४ धावांवर झेलबाद झाला.

- आयपीएलमधील ३६ वे शतक- शिखर धवनचे आयपीएलमधील पहिलेच शतक, यापूर्वी नाबाद ९७ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती- भारतीय खेळाडूंच्या नावावर १७ शतकं, तर उर्वरित शतकं परदेशी खेळाडूंनी झळकावली आहेत 

टॅग्स :IPL 2020शिखर धवनदिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्स