Join us  

CSKने ‘या’ खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवावे; माजी क्रिकेटपटूने सांगितला उपाय

स्टार फलंदाज सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत सीएसकेची मधली फळी काहीशी कमकुवत भासत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 3:39 PM

Open in App

मुंबई: आज चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) पुन्हा एकदा नव्याने लढण्यास सज्ज होणार असून त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hydrabad) होणार आहे. यंदाच्या सत्रातील याआधीच्या झालेल्या सामन्यात हैदराबादने चेन्नईला १० धावांनी नमविले होते. त्यामुळेच गेल्या काही सामन्यांतील निराशाजनक कामगिरी आणि हैदराबादविरुद्ध झालेला याआधीचा पराभव यामुळे दडपण सहाजिकच सीएसकेवर असेल. मात्र आता यातून बाहेर पडण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad Hogg) याने सीएसकेला एक उपाय सांगितला असून जर हा उपाय यशस्वी ठरला, तर पुन्हा एकदा सीएसकेची गाडी जोमात पळेल.

स्टार फलंदाज सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत सीएसकेची मधली फळी काहीशी कमकुवत भासत आहे. यावर हॉगने, ही कमतरता अष्टपैलू सॅम कुरेन भरुन काढू शकतो, असे सांगितले. आपल्या यू ट्यूब चॅनेलवर हॉगने म्हटले की, ‘चेन्नईच्या फलंदजीला मजबूती देण्यासाठी मी अष्टपैलू सॅअ कुरेनला तिसऱ्या स्थानी फलंदाजीला पाठवेन. या स्थानासाठी कुरेन योग्य पर्याय ठरु शकतो. तो अनेक टी-२० लीगमध्ये याच क्रमांकावर खेळलेला आहे. त्यामुळेच जर का कुरेनला तिसऱ्या स्थानी खेळवले, तर सीएसकेच्या फलंदाजीमध्ये नवी उर्जा येईल.’

हॉग पुढे म्हणाला की, ‘डावखुरा कुरेन टॉप ऑर्डरमधील सर्व उजव्या फलंदाजांवर भारी पडेल. तसेच त्याला अधिक मोकळीकपणे खेळण्याची संधी मिळेल. याआधी इंग्लंड आणि अन्य टी-२० लीगमध्ये त्याने असाच खेळ केला आहे.’त्याचप्रमाने, हॉगने सीएसकेने अंतिम संघात आणखी एक बदल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. हॉग म्हणाला की, ‘सीएसकेच्या अंतिम संघात मी ड्वेन ब्रावोऐवजी इम्रान ताहिरला संधी देईन. यासाठी मी ब्रावोची माफी मागेन. तो माझा आवडता खेळाडू आहे. पण, या लाइन अपमध्ये जास्त फिरकीपटूंची गरज आहे.’ 

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सIPL 2020सॅम कुरेन