CSK चा नाद करायचा नाय!; IPL मध्ये २०००+ धावा व १०० + विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू आहे MS Dhoniचा भीडू! 

IPL 2022 इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरुवात होणार आहे... म्हणजे चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह विक्रमांचाही धो धो पाऊस पडणार हे निश्चित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 04:23 PM2022-03-20T16:23:03+5:302022-03-20T16:24:20+5:30

whatsapp join usJoin us
CSK Ravindra Jadeja is a only player who have 2000 runs + 100 Wickets in indian Premier League | CSK चा नाद करायचा नाय!; IPL मध्ये २०००+ धावा व १०० + विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू आहे MS Dhoniचा भीडू! 

CSK चा नाद करायचा नाय!; IPL मध्ये २०००+ धावा व १०० + विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू आहे MS Dhoniचा भीडू! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

2000 runs + 100 Wickets in IPL - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा हे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत अग्रक्रमांकावर आहेत, तर गोलंदाजीत लसिथ मलिंगा, ड्वेन ब्राव्हो या खेळाडूंना अमित मिश्रा व पीयुष चावला यांनी कडवी टक्कर दिली आहे. पण, आयपीएलमध्ये बॅट अन् बॉल दोन्हींनी कमाल करणारे फार कमीच आहेत. त्यात २०००+धावा व १०० विकेट्स असा पराक्रम तर एकाच खेळाडूला करता आला आहे आणि तो MS Dhoni च्या चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) सदस्य आहे. 

आयपीएलमध्ये १००० + धावा व ५० + विकेट्स 

  • शेन वॉटसन - ३८७४ धावा व ९२ विकेट्स
  • कायरॉन पोलार्ड - ३२६८ धावा व ६५ विकेट्स 
  • जॅक कॅलिस - २४२७ धावा व ६५ विकेट्स
  • रवींद्र जडेजा - २३८६ धावा  व  १२७ विकेट्स 
  • आंद्रे रसेल - १७०० धावा व ७२ विकेट्स
  • ड्वेन ब्राव्हो - १५३७ धावा व १६७ विकेट्स
  • इरफान पठाण - ११३९ धावा व ८० विकेट्स
  • कृणाल पांड्या - ११४३ धावा  व ५१ विकेट्स

१००० + धावा व १०० + विकेट्स 

  • रवींद्र जडेजा - २३८६ धावा  व  १२७ विकेट्स 
  • ड्वेन ब्राव्हो - १५३७ धावा व १६७ विकेट्स 


 

२००० + धावा व १०० + विकेट्स

  • रवींद्र जडेजा - २३८६ धावा  व  १२७ विकेट्स 
  • आयपीएल २०२२ साठी चेन्नईने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाला पहिली पसंत दिली आहे. त्याच्यासाठी फ्रँचायझीने १५ कोटी राखून ठेवले, तर कर्णधार धोनीला १२ कोटींत रिटेन केले. ऋतुराज गायकवाडसाठी ६ तर मोईन अलीसाठी ८ कोटी फ्रँचायझीने मोजले. 

Web Title: CSK Ravindra Jadeja is a only player who have 2000 runs + 100 Wickets in indian Premier League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.