Join us  

'माझ्या पाठीशी CSK आहे म्हणून...', MS Dhoniनं सांगितलं यशामागचं सिक्रेट!

IPL 2020 : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करणार, याचे उत्तर इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) नंतरच स्पष्ट होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 1:36 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करणार, याचे उत्तर इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) नंतरच स्पष्ट होईल. आयपीएलच्या कामगिरीवर धोनीचं पुढील आंतरराष्ट्रीय भवितव्य अवलंबून आहे. इंग्लंडमध्ये गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. पण, आयपीएलमध्ये तो मैदानावर उतरणार आहे आणि त्यासाठी तो कसून तयारीलाही लागला आहे. सरावासाठी चेन्नईत दाखल होणाऱ्या धोनीचं चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK ) चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केले. 

वर्ल्ड कप ते आयपीएल यांच्यातील मधल्या काळात धोनीला निवृत्तीच्या चर्चांनी हैराण केले. अशा अनेक प्रसंगातून धोनी यापूर्वीही गेला आहे आणि या अशा प्रसंगात CSKत्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळेच धोनीनंही CSKचे आभार मानले आहे. CSK मुळेच एक चांगला माणूस बनू शकलो आणि कठीण प्रसंग हाताळण्याची शिकवण मिळाली, असे धोनीने सांगितले. 

'' 2008साली हा प्रवास सुरू झाला. CSKनं मला खूप मदत केली, एक क्रिकेटर म्हणूनच नव्हे तर चांगला माणूस म्हणून मी घडतो, तो त्यांच्या मदतीमुळेच. मैदानावरील किंवा बाहेरील कठीण प्रसंग कसे हाताळायचे हेही मला त्यांच्याकडून शिकलो,'' असे धोनीनं सांगितले.  

CSKचा कर्णधार म्हणून धोनीला चेन्नईचे चाहते थाला असे संबोधतात.  मागील 13 वर्षांत धोनीनं CSK चाहत्यांच्या मनात घर केले. क्रिकेटप्रेमींकडून मिळणाऱ्या आदराबद्दल धोनी म्हणाला,'' थालाचा खरा अर्थ भाऊ. चाहत्यांकडून मला हे नाव मी माझा गौरव समजतो. मी चेन्नईत किंवा दक्षिण भारतात असतो तेथे मला नावाने कुणीच हाक मारत नाही. सर्व मला थाला म्हणातात आणि हे माझ्याप्रती त्यांच्या मनात असलेलं प्रेम दर्शवते.'' 

चेन्नई सुपर किंग्सजे संपूर्ण वेळापत्रकवि. मुंबई इंडियन्स - 29 मार्च ( अवे) आणि 24 एप्रिल ( होम)वि. राजस्थान रॉयल्स - 2 एप्रिल ( होम) आणि 4 मे (अवे)वि. कोलकाता नाईट रायडर्स - 6 एप्रिल ( अवे) आणि 7 मे ( होम)वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 11 एप्रिल ( होम) आणि 17 एप्रिल ( अवे)वि. सनरायझर्स हैदराबाद - 19 एप्रिल ( होम) आणि 30 एप्रिल ( अवे)वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 27 एप्रिल ( होम) आणि 14 मे ( अवे)वि. दिल्ली कॅपिटल्स - 13 एप्रिल ( अवे) आणि 10 मे ( होम) 

चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, मुरली विजय, रुतुराज गायकवाड, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन 

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्स